आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहापारेषणच्या कराड परिमंडलाने आयोजित केलेल्या आंतर परिमंडलीय नाट्यस्पर्धेत वाशी परिमंडलाच्या भू-भू या नाटकाने प्रथम क्रमांक तर द्वितीय क्रमांक सांघिक कार्यालय, मुंबईच्या `द आऊट बर्स्ट` या नाटकाने पटकावला. वाशी परिमंडलाचे मंगेश कुलकर्णी उत्कृष्ट अभिनेता आणि हर्षदा वाघमारेला उत्कृष्ट अभिनेत्री पुरस्काराने गौरविण्यात आले.
कराड (जि.सातारा) येथील यशवंतराव चव्हाण स्मृतीसदन (टाऊन हॉल) येथे महापारेषण कंपनीच्या राज्यभरातील अधिकारी व कर्मचारी वर्गाने या राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेत विविध विषयांवर आठ नाटके सादर केली. या स्पर्धेचे बक्षीस वितरण महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. दिनेश वाघमारे (भा.प्र.से.) यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी महापारेषणचे संचालक (संचलन) अनिल कोलप, कार्यकारी संचालक (राज्य भार प्रेषण केंद्र) श्रीकांत जलतारे, मुख्य महाव्यवस्थापक (मा.सं.) सुधीर वानखेडे, अमरावती परिमंडलाचे मुख्य अभियंता जयंत विके, कराड परिमंडलाच्या मुख्य अभियंता शिल्पा कुंभार, नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता सतिश अणे, औरंगाबाद परिमंडलाचे मुख्य अभियंता रंगनाथ चव्हाण, मुख्य अभियंता (स्थापत्य) भूषण बल्लाळ, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी तथा मुख्य समन्वयक भरत पाटील, नाट्यसचिव चिदाप्पा कोळी उपस्थित होते. यावेळी दिनेश वाघमारे म्हणाले,`स्पर्धेत समाजप्रबोधन, चुकीच्या चालीरिती, पर्यावरण अशा विविध विषयांची मांडणी करणारी नाटके होती.
त्यामुळे या सर्वच नाटकातील कलाकारांचे मी अभिनंदन करतो. तसेच ज्यांना पारितोषिक मिळाले, त्यांनी याहीपेक्षा सुंदर काम करण्यासाठी प्रयत्न करावेत तर ज्यांना पारितोषिक मिळाले नाही, त्यांनी खचून न जाता पुढील वर्षी जोरात तयारी करून आपली कला सादर करावी. महापारेषणचे अधिकारी व कर्मचारी चौवीस तास काम करतात. कोविड काळात कर्मचाऱ्यांनी अखंड वीजपुरवठा केला. यामध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.