आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुजबळांचे वादग्रस्त वक्तव्य प्रकरण:विरोधी पक्षात असल्याने भुजबळांना काही काम नाही; भाजप आमदार गोपीचंद पडळकराची टीका

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आमदार छगन भुजबळ यांनी त्यांची भूमिका मांडली आहे. ते विरोधी पक्षात आहेत, त्यांच्याकडे काहीही काम उरलेले नाही, अशी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी गुरुवारी केली. सरस्वती मातेचा फोटो हवा कशाला, असे वादग्रस्त वक्तव्य छगन भुजबळ यांनी केले होते. एमपीएससी विद्यार्थ्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी पडळकरांनी या विद्यार्थ्यांशी चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. पडळकर म्हणाले, ‘छगन भुजबळ त्यांच्या पद्धतीने भूमिका मांडत असतात. पण लोकांच्या भावना महत्त्वाच्या आहेत. भुजबळ सध्या विरोधी पक्षामध्ये असल्याने त्यांच्याकडे काहीच काम शिल्लक नाही. राज्यात गदारोळ निर्माण होण्यासाठीच भुजबळ अशी विधाने करत असतात.’ ते म्हणाले, एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मागण्या व भूमिका सरकारी दरबारी मांडणार आहे. विद्यार्थ्यांना भेटल्याशिवाय, त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय त्यांचे प्रश्न कळणार नाहीत. सध्याच्या सरकारने एमपीएससी विद्यार्थ्यांचे विषय सकारात्मक घेतले आहेत. शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून विद्यार्थ्यांना अनेक नियुक्त्या दिल्या. येत्या मंगळवारी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना घेऊन मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांना भेटणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...