आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्रातील आशा कार्यकर्त्यांना दिल्या जाणाऱ्या कुटुंब नियोजन समुपदेशन किटमधील 'प्रजनन अवयवांच्या' मॉडेलवरून वाद निर्माण झाला आहे. भाजपने या किटचा विरोध करत सरकारवर टीका केली आहे. दरम्यान भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी या किटचे स्वागत केले आहे. आशा वर्कर्सने संकुचित विचार बाजूला ठेवावे अन्यथा 21 व्या शतकात देखील कुटुंब नियोजनच्या गप्पा हवेतच राहतील असे त्या म्हणाल्या आहेत.
याविषयी बोलताना तृप्ती देसाई म्हणाल्या की, 'सार्वजनिक आरोग्य विभागाने कुटुंब नियोजन किटमध्ये ग्रामीण भागांमध्ये प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी रबरी लिंग दिले आहे. यामध्ये काहीच चुकीचे नाही. आशा वर्कर्सनेसुद्धा संकुचित विचार बाजूला ठेवून कुटुंबनियोजन करण्यासाठी ग्रामीण भागामध्ये पुढाकार घ्यायला हवा. तसेच अशा पद्धतीचे प्रात्यक्षिक दाखवण्याची आता गरज निर्माण झाली आहे. आम्ही हे कसे दाखवू. यामुळे ग्रामिण भागांमधील महिला काय म्हणतील असा विचार महिलांनी करु नये. कुटुंब नियोजनाच्या या किटचे भूमाता ब्रिगेडच्या वतीने आम्ही स्वागतच करतो.' असे देखील तृप्ती देसाई म्हणाल्या.
भाजपकडून विरोध
सरकारकडून दिले जाणारे किट अत्यंत आक्षेपार्ह असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. सरकारचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचे त्या म्हणाल्या. कुटुंब नियोजन आणि लैंगिक स्वच्छतेबाबत जागरूकता वाढवण्यासाठी आरोग्य विभागाने कुटुंब नियोजन समुपदेशन किटचे वाटप केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.