आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राम मंदिर भूमिपूजन आनंदोत्सव:अयोध्येतील राममंदिर भूमीपूजनाच्या निमित्ताने अंबाबाईदेवीची रत्नजडीत अलंकारांनी पूजा, पाहा देवीच्या गाभाऱ्याचे सुंदर फोटो

कोल्हापूर3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मंदिरही सजले, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या सर्व मंदिरात आज विशेष पूजा अनुष्ठान

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज राम मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले. अनेक वर्षांपासून सुरू असलेला राम मंदिराचा संघर्ष आज संपला. मोठ्या उत्साहात हा सोहळा साजरा करण्यात आला. या सोहळ्याला कोरोना काळात मोजकेच लोक उपस्थित राहिले असले तरीही देशभरात आनंदोत्सव साजरा झाला. राज्यातील सर्वच मंदिरांमध्ये आज विशेष पूजा करण्यात आली. यासोबतच अंबाबाई मंदिरातही विशेष पूजा करण्यात आली.

अयोध्येतील राम मंदिर भूमीपूजनाचा दिवस उत्साहात साजरा करण्यासाठी आज पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अख्त्यारीतील तीन हजारहून अधिक मंदिरात विशेष पूजा व धार्मिक अनुष्ठान आयोजित केले होते. करवीर निवासिनी अंबाबाईची यानिमित्ताने आज रत्नजडीत अलंकारांनीयुक्त खडी पूजा बांधण्यात आली होती. तसेच संपूर्ण मंदिर फुलांच्या माळा, केळीचे खांब आणि विद्यूत रोषणाईने सजवण्यात आले होते.