आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालाेणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तीक व स्थानिक गुन्हे अन्वेष्ण पथकाचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी पुणे-मुंबई महामार्गा जवळ कुसगाव येथे सापळा रचून बेकायदेशीररित्या गुटखा विक्री करणारा ट्रक पकडला आहे. सदर ट्रक मधून पोलिसांनी 342 पाेती गुटखा जप्त केला आहे. तसेच वाहनासह एकूण 25 लाख 67 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती साेमवारी दिली आहे.
याप्रकरणी ट्रक चालक माेहम्मद खलील जमाल अहमद शेख (वय-40,रा.गुलबर्गा, कर्नाटक), ट्रक क्लिनर नसरुद्दीन बुरानसाहब खडखडे (35,रा.बिदर, कर्नाटक) व ट्रकमालक सदाम ऊर्फ सय्यद गुडुसाहब मुल्ला दस्तगीर (रा.गुलबर्गा, कर्नाटक) या तीघां विराेधात लाेणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहिता अधिनियमासह अन्न सुरक्षा व मानदे कायदा सन २००६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
कुसगाव येथे पोलिसांनी पुणे ते मुंबई एक्सप्रेस हायवे रस्त्यावर पुणे ते मुंबई बाजूकडे जाणारे लेनवर आरआरबी कार्यआलयाचे समाेरील बाजूस असणारे महामार्गावर सापळा लावून कर्नाटक राज्यातून पुणे बाजूकडून मुंबईकडे जाणार ट्रक (केए-32 एए 1138) हा जप्त केला. त्यामध्ये दहा लाख 67 हजार रुपयांची गुटख्याचे पुडयांनी भरलेली 342 पाेती व 15 लाखाचा ट्रक असा 25 लाख 67 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे.
सदरची कारवाई पोलिस अधिक्षक पुणे ग्रामीण अंकित गाेयल, अपर पोलिस अधिक्षक मितेश घट्टे,यांचे मार्गदर्शनाखाली, सहा.पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, एलसीबी पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, एपीआय महादेव शेलार, पीएसआय शुभम चव्हाण, प्रकाश वाघमारे, युवराज बनसाेडे, पाेहवा अंकुश नायकुडे, स्वप्नील अहिवळे, चंद्रकांत जाधव, मंगेश थिगळे, पाेना अमाेल शेंडगे, पाेकाॅ सुभाष शिंदे, अंकुश पवार अक्षय सुपे यांचे पथकाने केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.