आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजित पवारांनी विरोधकांना फटकारले:म्हणाले- सुहेल खंडवानीवरील NIAच्या छाप्याचा नवाब मलिकांशी चौकशीआधीच उगाच संबंध जोडू नका

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांबद्दल बोलताना म्हणाले की, मलिकांची आधी चौकशी पुर्ण होऊ द्या, चौकशी करण्याआधीच संबंध जोडू नका, मी आधीच सांगितले आहे. चुकीचे कुणीच वागू नये. मुंबईत एनआयएने छापासत्र सुरु केले आहे याप्रकरणी अनेकांनी मलिकांचा संबंध जोडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. या प्रकरणामध्ये माहीम दर्ग्याचे विश्वस्त सुहेल खंडवानी यांची एनआयएने तब्बल 13 तास चौकशी केली आहे. याप्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपले मत व्यक्त केले आहे.

नेमके काय म्हणाले अजित पवार?
मुंबई आणि मुंबई आसपासच्या परिसरात 24 ठिकाणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने आज सकाळपासून छापेमारी केली आहे. या छापेमारीत एनआयएने मोठ्या प्रमाणात रोख रक्कम, शस्त्रसाठ्यासह संशयित कागदपत्रे जप्त केली आहेत. दरम्यान हा मोठ्या प्रमाणात जमा झालेला पैसा आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेला पुरवला जात असल्याचा दावाही एनआयएने केला आहे. त्यांनी आपल्या प्रेस रिलीजमध्ये तसा उल्लेख केलाय. याच पार्श्वभूमिवर पत्रकारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, देशद्रोही लोकांच्या बाबतीत काम करणे, चुकीच्या पद्धतीने वागणाऱ्या देशद्रोही लोकांवर धाडी टाकणे, देशाच्या सुरक्षेला हानी पोहचविणाऱ्या लोकांवर कारवाई करण हे एनआयएचे काम आहे. आणि ते त्यांचे काम करत आहेत.

मलिकांची चौकशी सुरू आहे संबंध जोडू नका

नवाब मलिकांची चौकशी सुरू आहे. त्यांच्या संबंध कुणाशी जोडू नये असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. शिवाय अशा देशद्रोही लोकांवर, देशाच्या सुरक्षेला हानी पोहचविणाऱ्यांवर कारवाई करायलाच हवी त्यांना उघडे पाडायलाच हवे असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...