आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय नाट्यावर बिचुकलेंची प्रतिक्रिया:म्हणाले - "आज बाळासाहेब ठाकरे असते तर एकनाथ शिंदेंच्या कानाखाली जाळ काढला असता"

4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एकनाथ शिंदे सध्या गुजरातमध्ये गेले असून त्यांच्यासोबत शिवसेनेचे काही आमदार आहेत

'मराठी बिग बॉस' फेम आणि सध्या राष्ट्रपती पदासाठी इच्छूक असलेले अभिजीत बिचुकले यांनी महाराष्ट्रातील राजकीय नाट्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते नुकतेच देहू येथे दर्शनासाठी आले होते. यावेळी शिवसेनेचे नेते आमदार एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडावर प्रतिक्रिया देताना बिचुकले यांनी त्यांच्या शब्दांत शिंदेंना कडवे बोल सुनावले आहेत. एकनाथ शिंदे सध्या गुजरातमध्ये गेले असून त्यांच्यासोबत शिवसेनेचे काही आमदार आहेत. शिवसेनेच्या नेतृत्वावर त्यांचा आक्षेप असून भाजपासोबत सरकार स्थापन करण्याची त्यांनी शिवेसेनेकडे मागणी केली आहे.

तर बाळासाहेबांनी शिंदेंच्या कानाखाली जाळ काढला असता...
अभिजीत बिचुकले म्हणाले, "आज जी परिस्थिती आहे यावेळी जर बाळासाहेब ठाकरे असते तर एकनाथ शिंदेंच्या कानाखाली जाळ काढला असता, असे ते म्हणाले. तसेच उद्धव ठाकरे या संकटातून बाहेर पडतील आणि मुख्यमंत्री तेच राहतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. "मी जेव्हा वरळीतून निवडणुकीसाठी उभा होतो तेव्हाचा माझा अभिमान आत्ताच्या राजकारण्यांकडून कॉपी केली जात आहे." असेही ते म्हणाले.

दरम्यान काल विधान परिषदेचा निकाल लागला आणि त्यामध्ये काँग्रेसच्या एका उमेदवाराचा पराभव झाला आहे. निकालानंतर एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थकांमध्ये नाराजी दिसून आली आहे. ते सध्या भाजप नेत्यांच्या संपर्कात असून भाजपसोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव त्यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना पाठवला आहे.

बातम्या आणखी आहेत...