आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठ रंगकर्मी वामन केंद्रेंना बिहारचा राष्ट्रीय रंग सन्मान:कलेतील दीर्घ योगदानाचा सन्मान, केंद्रे म्हणाले - हा पुरस्कार म्हणजे माझ्यासाठी आशिर्वादच

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महान बिदेशिया कलाकार व आधुनिक बिहार रंगभुमीचे जनक स्वर्गीय भिखारी ठाकुर यांच्या बिहार राज्याच्या प्रस्तुति या अत्यंत महत्त्वाच्या नाट्य संस्थेच्या वतीने राष्ट्रीय नाट्य महोत्सवाचे औचित्य साधून सुरू करण्यात आलेल्या “रमेश प्रसाद सींग राष्ट्रीय रंग सन्मान 23 ”घोषणा नुकतीच करण्यात आली. हा पुरस्कार मराठवाड्याचे सुपुत्र पद्मश्री प्रा. वामन केंद्रे यांना त्यांच्या एकुणच भारतीय रंगभूमीवरील अतुलनीय योगदानासाठी जाहीर झाला आहे.

नाट्यदिग्दर्शनात धाडसी प्रयोग

नाट्य दिग्दर्शनात त्यांनी केलेले धाडसी आणि पथदर्शी प्रयोग, भारतीय रंगमंचावर त्यांनी निर्माण केलेली रंगभाषा, आपल्या नाटकातून त्यांनी दुर्लक्षित, वंचित,पद दलित व गावकुसाबाहेरच्या माणसाचं/समाजाचं जगणं व त्यांच्या वेदनेला राष्ट्रीय रंगमंचावरून प्राप्त करून दिलेला आवाज, आधुनिक नाट्य प्रशिक्षणात त्यांनी केलेले अमूल्य योगदान व देशात व परदेशात घडवलेले हजारो कलाकार, रंगभुमी संदर्भातले त्यांनी केलेले संशोधन,उभ्या केलेल्या महत्त्वाच्या नाट्य संस्था व प्रस्थापित संस्थांच्या विकासामध्ये केलेले अनोखे योगदान तसेच भारतीय रंगभुमीच्या विकासात सुरू केलेले पायाभूत उपक्रम, भारतीय रंगभूमीला मिळवून दिलेली आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा, या सगळ्यांचा हा राष्ट्रीय पुरस्कार देताना विचार करण्यात आला व पुरस्कार समितीच्या वतिने सर्व सम्मतीने व एकमताने हा सन्मान प्रा. केंद्रे यांना जाहीर करण्यात आला.

उद्या पटनामध्ये होणार वितरण

हा सन्मान प्रा. केंद्रे यांना उद्दा दिनांक 3 जानेवारी 2023 रोजी पटना येथे होणा-या प्रस्तुति रंगमंडळाच्या राष्ट्रीय नाट्य महोत्सवाच्या दिमाखदार उदघाटन सोहळ्यात समारंभपुर्वक प्रदान करण्यात येणार आहे.

भारतीय समृद्ध नाट्य परंपरेतले अग्रणी कलाकार, विदेशिया या लोककलेचे जनक व बिहारच्या आधुनिक रंगभूमीचा ठोस पाया रचणा-या भिखारी ठाकुर यांच्या राज्यातून मिळणारा हा पुरस्कार म्हणजे माझ्यासाठी साक्षात त्यांचा पवित्र आशिर्वादच आहे असे मत प्रा. वामन केंद्रे यांनी व्यक्त केले तसेच या सन्मानासाठी प्रस्तुति नाट्य संस्थेच्या सर्वेसर्वा श्रीमती शारदा सिंग, संजय उपाध्याय व पुरस्कार समितीचे सर्व सदस्य यांचे त्यांनी मनापासुन आभारही मानले.

प्रा. केंद्रे यांना मिळणारा हा सातवा राष्ट्रीय पुरस्कार आहे. या पुर्वी त्यांना भारत सरकारच्या वतिने पद्मश्री, केंद्रीय संगीत नाटक अकादमी पुरस्कार, मध्य प्रदेश शासनाचा राष्ट्रीय कालीदास सन्मान, एन. एस. डी. चा ब. व. कारंत स्मृती पुरस्कार तसेच मनोहर सींग स्मृती पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. विशेष म्हणजे एन. एस. डी. चे उपरोक्त दोन्ही राष्ट्रीय पुरस्कार पटकावणारे राष्ट्रीय नाट्य विद्दालयाचे ते पहिले स्नातक आहेत. तसेच उज्जैन येथील पहिला ‘अभिनव राष्ट्रीय रंग सम्मान २०२२’ मिळवणारे ते पहिले रंगकर्मी आहेत.

----

बातम्या आणखी आहेत...