आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
राज्यभरात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. ८ जानेवारीपासून २२ जिल्ह्यांत ५,१५१ पक्ष्यांच्या मृत्यूची नाेंद झाली आहे. शुक्रवारी राज्यात ९८२ पक्षी मृतावस्थेत आढळले.
बगळे, पाेपट, चिमण्या आणि अन्य पक्ष्यांत २१ जिल्ह्यांत एकूण ६७ पक्ष्यांचा आकस्मिक मृत्यू झालेला आहे. भाेपाळच्या राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुराेग प्रयाेगशाळा व पुण्यातील प्रयाेगशाळेत मृत पक्ष्यांचे नमुने तपासणीस पाठवण्यात येत आहेत. परभणी जिल्ह्यातील मुरुंबा येथे ३,४४३, अहमदपूरच्या केंद्रावाडीत ११ हजार ६४ कुक्कुट पक्षी, लातूरच्या सुकनीत २८ कुक्कट पक्षी नष्ट करण्यात आले आहेत. तसेच येथे निर्जंतुकीकरणाची कार्यवाही पूर्ण करण्यात आली. मुंबई, घाेडबंदर व दापाेली येथे कावळे व बगळे तसेच परभणी जिल्ह्यात मुरुंबात पाेल्ट्री फार्ममध्ये एच ५ एन १ विषाणूचा प्रादुर्भाव आढळला आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.