आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपचार:बालविवाहातून मुलीची प्रसूती; पतीवर बलात्काराचा गुन्हा

सातारा6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रेमप्रकरणातून एक वर्षापूर्वी अल्पवयीन मुलीबरोबर बालविवाह होऊन त्या अल्पवयीन मुलीची प्रसूती सातारा येथील जिल्हा रुग्णालयात झाली. दरम्यान, याप्रकरणी आता तिच्या पतीवर पोक्सोअंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी विवाहित अल्पवयीन मुलगी हिने दिलेल्या फिर्यादीनुसार, तिचे लग्न ६ एप्रिल २०२२ रोजी झाले होते. त्यानंतर दोन्ही कुटुंबांच्या सहमतीने मुलगी पतीच्या घरी राहू लागली. १३ मार्च २०२३ रोजी मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान ती प्रसूत झाली. मुलीचे वय कमी असतानाही लग्न करून तिला प्रसूत केल्याने पतीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...