आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:साहित्यिक कलावंत संमेलनाध्यक्षपदी विश्वास पाटील

पुणे12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानतर्फे आयोजित २२ वे साहित्यिक कलावंत संमेलन २४ आणि २५ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दिलीप बराटे यांनी रविवारी येथे दिली. मराठी साहित्य विश्वात विश्वास पाटील यांचे योगदान महत्त्वपूर्ण असून ३५ पेक्षा अधिक ग्रंथांचे लेखन त्यांनी केले आहे. प्रशासनात आय.ए.एस. अधिकारी म्हणून सेवा पूर्ण केलेल्या विश्वास पाटील यांना साहित्य अकादमीसह ६० पेक्षा जास्त पुरस्कार मिळालेले आहेत. अत्यंत प्रतिष्ठेच्या इंदिरा गोस्वामी राष्ट्रीय पुरस्काराने देखील त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. अनेक भारतीय भाषांमध्ये त्यांच्या कादंबऱ्यांची भाषांतरे झाली आहेत.

बातम्या आणखी आहेत...