आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

64 वा स्थापना दिवस:BROने बांधलेले बोगदे, रस्ते, पूलांमुळे संरक्षणच नव्हे सीमा भागांत विकासही झाला- अजय भट्ट

पुणे24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सीमा रस्ते संघटना (बीआरओ)ने रविवारी देशभरातील सर्व केंद्रांमध्ये आपला 64 वा स्थापना दिवस साजरा केला. यानिमित्ताने मुख्य कार्यक्रमाचा भाग म्हणून पुण्यातील सीमा रस्ते संघटना केंद्रात मुख्य अभियंते आणि उपकरणे व्यवस्थापन परिषद आयोजित करण्यात आली होती. संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट या कार्यक्रमात उपस्थित होते.

स्थापना दिवसानिमित्त, संरक्षण राज्य मंत्र्यांच्या हस्ते पुण्यातील केंद्राच्या आवारात बीआरओ तांत्रिक प्रशिक्षण संकुल आणि स्वयंचलित ड्रायव्हिंग ट्रॅकचे उद्घाटन झाले. या सुविधांमुळे सीमा रस्ते संघटना कर्मचार्‍यांचा प्रशिक्षण दर्जा सुधारेल आणि विविध आव्हानांना तोंड देण्यासाठी ते अधिक चांगल्या प्रकारे सज्ज होण्यास मदत होईल.

‘डिजिटल इंडिया’ उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केलेले बीआरओ-केंद्रित सॉफ्टवेअरही यावेळी लॉन्च करण्यात आले. बीआरओच्या कामकाजाचे विविध पैलू स्वयंचलित करण्यासाठी तसेच सुरळीत आणि जलद काम व्हावे यासाठी आणि वाढीव पारदर्शकतेसाठी रिक्रूटमेंट मॅनेजमेंट सिस्टीम, इलेक्ट्रॉनिक मेजरमेंट बुक आणि वर्क मॅनेजमेंट सिस्टीम हे तीनही सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहेत.

याशिवाय, स्वदेशी वर्ग 70आर डबल लेन मॉड्युलर पुलांच्या बांधकामासाठी बीआरओ आणि जीआरएसई यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. हे पूल सशस्त्र दलांच्या कार्यान्वयन तयारीला चालना देण्यासाठी मदत करतील.

सीमा रस्ते संघटनेने 'बीआरओ व्हिजन@2047' वरील मोनोग्राफसह अनेक दस्तऐवजांची संकल्पना केली आहे. यामध्ये, रस्त्यालगतच्या घोषवाक्यांचे संकलन; वैद्यकीय आस्थापनांची सुधारणा आणि मानकीकरण; बीआरओ मालमत्तेचे निरीक्षण करण्यासाठी उपग्रहांच्या वापरासह संरक्षण उत्कृष्टतेसाठीच्या नवकल्पनांची गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळा आणि पुलांची रचना तसेच समस्या समाधान यांचा समावेश आहे.

अजय भट्ट म्हणाले, बीआरओच्या जवानांनी बांधलेले रस्ते, पूल आणि बोगद्यांमुळे केवळ सशस्त्र दलांची सज्जता वाढली नाही तर सीमावर्ती भागांचा सामाजिक-आर्थिक विकास व्हायलाही मदत झाली आहे, असे ते म्हणाले. सेला बोगदा आणि नेचिफू बोगदा प्रकल्पातील लक्षणीय प्रगतीबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले.सीमावर्ती क्षेत्राच्या विकासाला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नवभारत अभूतपूर्व वेगाने प्रगती करत आहे. आपण पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलो आहोत आणि अनेक देशांना आपण लष्करी उपकरणे निर्यात करत आहोत. हा नवभारत मजबूत आहे आणि स्वतःचे हित जपण्यासाठी सक्षम आहे. आम्ही कोणापुढे झुकत नाही आणि झुकणार नाही, असे ते यावेळी म्हणाले.

बीआरओ 60 वर्षांहून अधिक काळ कार्यरत असून या संघटनेने भारताच्या सीमेवर तसेच भूतान, म्यानमार, अफगाणिस्तान आणि ताजिकिस्तानसह परदेशी मित्र देशांमध्ये 61,000 किलोमीटरहून अधिक रस्ते, 900 हून अधिक पूल, चार बोगदे आणि 19 हवाई क्षेत्रे बांधली आहेत.2022-23 मध्ये बीआरओने 103 पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण केले.