आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवार म्हणून अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी सोमवारी अर्ज दाखल केला. त्यांनी स्वतःचे वार्षिक उत्पन्न (वर्ष 2021-22) 66.36 लाख रुपये घोषित केले आहे. याशिवाय मुलगा आदित्यचे वार्षिक उत्पन्न 37.88 लाख असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
व्यवसाय शेती
अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी उमेदवारी अर्जात आपला व्यवसाय शेती असल्याचा उल्लेख केला आहे. अश्विनी जगताप या चंद्ररंग डेव्हलपर्स अँड बिल्डर्स प्रा.लि. मध्ये संचालक आणि चंद्ररंग फार्म व नर्सरीमध्ये भागीदार आहेत. व्यवसाय, गुंतवणुकीवर मिळणारे व्याज आणि लाभांश हे त्यांनी त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत सांगितले आहेत.
2.22 कोटी रुपयांचे दागिने
भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांच्याकडे एकूण 11.4 कोटी रुपयांची आणि पती व दिवंगत आमदारलक्ष्मण जगताप यांच्या नावावर 5.46 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे. अश्विनी जगताप यांच्याकडे 94,807 रुपये रोख आहेत. तर, 2.22 कोटी रुपयांचे सोने, चांदी आणि मौल्यवान रत्नांचे दागिने आहेत. यामध्ये सोने 2334.53 ग्रॅम, चांदी 16666.04 ग्रॅम, आणि जेम्स स्टोन स्टडेड 1029.26 कॅरेटचे दागिने आहेत.
जवळपास 7 कोटींचे कर्ज
याशिवाय अश्विनी जगताप यांच्या स्वत:च्या नावावर 2.87 कोटी रुपयांची आणि पती लक्ष्मण जगताप यांच्या नावावर 12.46 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ताही आहे. करोडोंच्या मालमत्तेच्या मालक अश्विनी जगताप यांच्यावर 12.10 लाख आणि दिवंगत पती लक्ष्मण जगताप यांच्यावर 6.49 कोटी रुपयांचे कर्ज आहे.
कसबा पोटनिवडणुकीतील उमेदवारांची मालमत्ता
पुणे जिल्ह्याचे कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी भाजपचे उमेदवार हेमंत नारायण रासणे आणि काँग्रेसचे उमेदवार रवींद्र हेमराज धंगेकर यांनी उमेदवारी दाखल केली. यासोबतच दोन्ही उमेदवारांची कोट्यवधींची जंगम आणि स्थावर मालमत्ताही सार्वजनिक झाली आहे.
हेमंत नारायण रासणे (भाजप)
2021-22 मध्ये भाजपचे उमेदवार हेमंत रासणे यांचे वार्षिक उत्पन्न 5.75 लाख रुपये होते. पत्नी मृणाली यांचे वार्षिक उत्पन्न 4.30 लाख आणि मुलगी तेजस्विनीचे उत्पन्न शून्य होते. आपल्यावर एकही गुन्हा दाखल नसल्याची माहिती त्यांनी उमेदवारी अर्जात दिली आहे. रासणे यांच्याकडे १.३५ लाख रुपये आणि पत्नीकडे २२ हजार रुपये रोख आहेत. यासोबतच त्यांच्याकडे 1.82 कोटी रुपयांची आणि पत्नीकडे 27.59 लाख रुपयांची जंगम मालमत्ता आहे. रासणे यांच्याकडे 10 तोळे (किंमत 4.52 लाख) आणि त्यांच्या पत्नीकडे 18 तोळे (किंमत 8.13 लाख) सोने आहेत. यासोबतच पत्नीकडे 250 ग्रॅम चांदी (किंमत 17500 रुपये) आहे. भाजपचे उमेदवार रासणे यांच्याकडे 7.98 कोटी आणि त्यांच्या पत्नीकडे 253 कोटींची स्थावर मालमत्ता पण आहे. कोट्यवधी रुपयांचा मालक रासणे यांच्यावर 3.55 कोटी आणि त्यांच्या पत्नीवर 24.93 लाख रुपयांचे कर्ज आहे.
रविंद्र हेमराज धंगेकर (काँग्रेस)
काँग्रेसचे उमेदवार रवींद्र हेमराज धंगेकर यांनी 2022-23 मध्ये त्यांचे वार्षिक उत्पन्न रु.3.36 लाख आणि पत्नीचे वार्षिक उत्पन्न रु.3.98 लाख असल्याचे जाहीर केले आहे. त्यांच्याविरुद्ध पुण्यातील विविध पोलीस ठाण्यात एकूण 9 एफआयआर दाखल आहेत. यासह एकूण 9 प्रकरणांची सुनावणी न्यायालयात सुरू आहे. त्यांच्याकडे 1.80 लाख रुपये आणि पत्नीकडे 3.50 लाख रुपये रोख आहेत. यासोबतच त्यांच्या नावावर 47.06 लाख रुपयांची आणि पत्नीच्या नावावर 68.67 लाख रुपयांची जंगम मालमत्ता आहे. धंगेकर यांच्याकडे 10 तोळे सोने (किंमत 5.90 लाख) आणि त्यांच्या पत्नीकडे 15 तोळे सोने (7.50 लाख रुपये) आहे. कोट्यवधींच्या जंगम मालमत्तेसोबतच काँग्रेसच्या उमेदवाराकडे 4.59 कोटींची स्थावर मालमत्ताही आहे. पत्नीच्या नावावर पण 2.60 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. धंगेकरांवर 35.43 लाख आणि त्यांच्या पत्नीवर 32.08 लाख रुपयांचे कर्ज आहे.
हेही वाचा,
चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक:राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे उमेदवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची घोषणा
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे हे उमेदवार असतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विटरवरुन ही घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते, अशी नाना काटे यांची ओळख आहे. ते पिंपरी-चिंचवड महापालिकेत सध्या नगरसेवक आहेत. वाचा सविस्तर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.