आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाटलांचा टोला:आज आले नसते तर फरार घोषित केले असते, ते टाळण्यासाठीच आज ईडी समोर हजर झाले अनिल देशमुख; चंद्रकांत पाटलांचा टोला

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

100 कोटी वसुलीचे आरोप केल्यानंतर अडचणीत सापडलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख आज अखेर ईडी कार्यालयात हजर झाले आहेत. यापूर्वी अनिल देशमुखांना ईडीने 5 वेळा समन्स बजावला होता. मात्र ते एकदाही ईडी कार्यालयात दाखल झाले नव्हते. त्यांच्या ऐवजी त्यांचे वकील इंद्रपाल सिंह हे ईडी कार्यालयात पोहोचले होते. देशमुख यांचे वय 75 वर्षे आहेत आणि महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे ते हजर राहू शकत नाहीत असा युक्तिवाद करण्यात आला होता. मात्र ते आज ईडी कार्यालयात हजर झाल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनीही त्याच्यावर निशाणा साधला आहे.

अनिल देशमुख ईडीसमोर हजर झाल्यानंतर चंद्रकांत पाटील म्हणाले की, 'अनिल देशमुख हे आज प्रकट झाले पण मग ते या पूर्वीच का आले नाहीत? आता काय कारवाई करायचे ते ईडी ठरवले. जर ते आज ईडीसमोर आले नसते तर त्यांना फरार घोषित करण्यात आले असते. ते टाळण्यासाठीच ते आज ईडी कार्यालयातमध्ये दाखल झाले आहेत. हे सर्व प्रयत्न अटक टाळण्यासाठी करेले जात तआहेत. मात्र, त्यांना शरण जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता असा टोला चंद्रकांत पाटलांनी लगावला आहे.

दरम्यान अनिल देशमुख चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर झाले आहे. सकाळीच ते हजर झाले. त्यांची कसून चौकशी केली जाणार आहे. आता अनिल देशमुखांची केवळ चौकशी केली जाणार की त्यांना अटक होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. तत्पूर्वी अनिल देशमुखांना ट्विटरवर एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. यात ते म्हणाले आहेत की, 'मा. उच्च न्यायालयाने माझ्या संविधानातील अधिकारात मला विशेष कोर्टात जाण्याचे स्वातंत्र दिले असतानाही मी आज ईडीच्या कार्यालयात जाऊन चौकशी साठी संपुर्ण सहकार्य करणार आहे.'

बातम्या आणखी आहेत...