आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांचे भाषण हा त्यांच्या मनोगताचा भाग:शिवसेनेतील घडामोडींशी भाजपचा संबंध नाही - चंद्रकांत पाटील

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाइनच्या माध्यमातून जो संवाद साधला आहे त्यावर मी बोलणार नाही, हा त्यांच्या मनोगताचा भाग आहे. यावर माझी नो कॉमेंट, जे काही शिवसेनेत सुरू आहे त्याच्याशी भाजपचा काहीही संबंध नाही असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या निकालानंतर गुलाल उधळण्यात आला आहे, आत्ता विधानसभेची तयारी आहे का? यावर पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, मी हा गुलाल आत्ता राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी शिल्लक ठेवला आहे असेही यावेळी पाटील म्हणाले.

देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर आहे यावर पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की आमच्याकडे एक पद्धत आहे कोणतीही मोठी निवडणूक जिंकलो की दिल्लीत जाऊन पक्ष श्रेष्ठींना माहिती द्यावी लागते आणि त्यासाठी फडणवीस हे दिल्लीला गेले आहेत. मी खूप दिवस मुंबईत राहिलो असल्याने मी येथे आलो आणि ते दिल्लीला गेले असेही यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले.

दोन वर्ष कोरोनामुळे होऊ न शकलेल्या वारीला पुन्हा उत्साहात सुरुवात झाली आहे. वारकऱ्यांना दोन वर्षे विठ्ठलाचे दर्शन मिळाले नाही. वारकरी हे दर्शनासाठी आतुर झाले आहेत. मोठ्या संख्येने वारकरी हे पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघालेले आहे. वारकऱ्यांचा पुण्यात स्वागत करतो आणि मी माऊलीच्या दर्शनासाठी या ठिकाणी आलो आहे असेही ते म्हणाले.