आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाटलांची राऊतांवर टीका:"मी गावाचा पाटील आहे, संजय राऊतांपेक्षा भयानक भाषेत बोलू शकतो, पण ही माझी संस्कृती नाही" चंद्रकांत पाटलांचे प्रत्युत्तर

पुणे6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात महाविकास आघाडी आणि विरोधात बसलेल्या भाजपचे आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरुच आहे. दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना खासदार संजय राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे. 'मी कोल्हापूर जिल्ह्यातील एका गावचा पाटील आहे. संजय राऊत यांच्यापेक्षा भयानक भाषेत मी बोलू शकतो. पण त्यांना कळेल म्हणून तशी भाषा वापरणे ही माझी संस्कृती नाही,' अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे. ते आज पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

पुढे पाटील म्हणाले की, 'समोरच्याला जी भाषा कळते, त्या भाषेत मी बोलतो. असे चंद्रकांत पाटील म्हणाले. संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वीच वापरलेल्या निर्लज्ज भाषेवर चंद्रकांत पाटलांनी उत्तर दिले. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यावर देखील पाटील यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, '2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी अशीच बिगरभाजप पक्षांनी महाआघाडी बनवली होती व भाजपाला बहुमत मिळणार नाही अशी हवा निर्माण केली होती. तरीही त्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपच्या जागा वाढून पक्षाला 303 जागांसह पूर्ण बहुमत मिळाले. 2024 लोकसभा निवडणुकीत भाजपच्या जागा आणखी वाढतील. पण भाजपाविरोधी पक्षांनी आशा ठेवायला आणि प्रयत्न करायला हरकत नाही. शिवसेनेला गोव्याच्या गेल्या विधानसभा निवडणुकीत सगळे उमेदवार मिळून एकूण 743 मते मिळाली होती, तरीही यावेळी त्यांनी सरकार स्थापनेचा दावा केला आहे. असे म्हणत पाटलांनी शिवसेनेची खिल्ली उडवली.

मुख्यमंत्री आमचे मित्र आहेत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आपचे चांगले मित्र आहेत. एकतर्फी का असेना आमची चांगली मैत्री आहे. ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव आहेत. अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केले. संजय राऊत हे कालपरवा आलेले आहे. त्यांनी आम्हाला शिकवू नये. ते शरद पवारांच्या अजेंड्यावर काम करताहेत हे उद्धव ठाकरे यांनी समजून घ्यावे, इतकेच आमचे मत आहे. मी कोणाला सल्ला देण्याइतका मोठा नाही. संजय राऊतांना मी कुठलाही सल्ला दिलेला नाही. त्यांना सल्ला देण्याचे धाडस परमेश्वरही करणार नाही. असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...