आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मराठा आरक्षण:भाजप नेत्यांनी चिथावणीखोर वक्तव्य करू नये, अन्यथा...; काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांचा इशारा

पुणे7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चिथावणीखोर वक्तव्ये करून ते त्यांच्या बुद्धीची दिवाळखोरी प्रकट करत आहेत

मराठा आरक्षणप्रकरणी ‘महाविकास आघाडी’ सरकारने सर्वोच्च न्यायालयात सर्वतोपरी बाजू मांडली असताना न्यायालयाने दिलेल्या निकालावर राज्यातील भाजप नेते ‘पातळी सोडून टीका’ करीत आहेत. हे कृत्य घटनाविरोधी व सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करणारे आहे. ही वक्तव्ये ‘सामाजिक उद्रेकास’ कारणीभूत ठरणारी आहेत, याचे भान या नेत्यांनी ठेवावे, असा इशारा काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी दिला आहे.

मराठा समाज आरक्षण हे सर्वस्वी ‘सर्वोच्च न्यायालयाच्या व संविधानाच्या अख्यत्यारीतील’ विषय आहे, हे न समजण्या एवढे भाजप नेते अपरिपक्व नाहीत. चिथावणीखोर वक्तव्ये करून ते त्यांच्या बुद्धीची दिवाळखोरी प्रकट करत आहेत. ‘मराठा समाज आरक्षणाच्या’ संवेदनशील प्रश्नावर’ मराठा समाजाच्या तरुणांची माथी भडकवण्याचे दुष्टकृत्य ही नेते मंडळी जाणीवपूर्वक करीत आहेत काय, असा सवाल तिवारी यांनी केला आहे. मोदी सरकारने खासगीकरणाचा सपाटा लावून शासकीय संस्था व शासकीय नोकऱ्याच संपुष्टात आणण्याचे काम सुरू केले आहे. खरेतर, त्याविरुद्ध भाजप नेत्यांनी आवाज उठवून त्यांना खासगीकरणापासून रोखावे, असे आवाहनही त्यांनी केले.

0