आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • BJP Mission Baramati | Chanrashekhar Bavankule Today Baramanti | BJP Mission Mumbai And Baramati, BJP's Direct Challenge To Sharad Pawar By Coming To Baramati; The Target Is To Win 45 Seats In The Lok Sabha And 200 Seats In The Legislative Assembly

अनेक गड उद्ध्वस्त झालेत, हा देशाचा इतिहास:बारामतीत येऊन भाजपचे पवारांना थेट चॅलेंज; लोकसभेत 45, विधानसभेत 200 जागा जिंकण्याचं टार्गेट

बारामतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

लोकसभेत 45 आणि विधानसभेत 200 पेक्षा जास्त जागा भाजप निवडून आणार, देशामध्ये अनेक गड उद्धस्त झालेत. जेव्हा संघटन मजबूत होते तेव्हा संघर्ष करण्याची ताकद निर्माण होते, त्यानंतर मात्र चांगले-चांगले गड उद्ध्वस्त होतात, हा देशाचा इतिहास आहे. त्यामुळे कोणाचा गड राहत नाही वेळेनुसार ते बदलत असते, असे म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना आव्हान दिले आहे. ते आज बारामतीत पत्रकारांशी बोलत होते.

मुंबईनंतर आता भाजपने राष्ट्रवादीचा बालेकिल्ला बारामतीकडे आपला मोर्चा वळवला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दौऱ्याने आज 'मिशन बारामती'ची सुरुवात झाली. विशेष म्हणजे शरद पवार ज्या कनेरी गावातून निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात करतात तेथील हनुमान मंदिरातून भाजप आपल्या दौऱ्याला सुरुवात केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

तगडी लढत देणार

पुढे बावनकुळे म्हणाले की, येत्या दोन महिन्यात मी राज्याच्या संपूर्ण जिल्ह्यात जाणार आहे. पुढच्या काळात होणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा तसेच विधानसभा या निवडणुकांमध्ये शिंदे गट आण भाजप मिळून निवडणूक लढवणार आहे. महाराष्ट्रात 45 च्या पुढे लोकसभा आणि 200 च्या पुढे विधानसभेच्या जागा जिंकणार जनता धोकाबाजांना बाजूला ठेवेल आणि हिंदुत्वाचे रक्षण करणाऱ्यांना मदत करेल. असल्याचा दावा देखील बावनकुळेंनी केला.

सीतारमण बारामती दौऱ्यावर

बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे संघटन मजबूत करणे, तसेच संघट शक्ती वाढवणे या दृष्टीने ही लोकसभा प्रवास योजना आहे. रात्री 10 वाजेपर्यंत बारामतीच्या विविध भागात प्रवास करणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण या बारामतीसाठी पूर्णवेळ प्रभारी असून पुढच्या 18 महिन्यात त्या पाच ते सहा वेळा बारामतीत येऊन प्रत्येक वेळी तीन दिवस मुक्कामी असणार आहे. केंद्र सरकारकडून बारामतीत काय विकास करता येईल, राज्य सरकारकडून काय करता येईल. गेली अडीच वर्षाच केंद्राकडून अनेक योजना पुरवण्यात आल्या मात्र, मविआ सरकारने त्याला ब्रेक लावल्याचा आरोप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

हाच आमचा उद्देश

पुढे ते म्हणाले की, या सर्व योजनांचे आता ऑडीट होणार असून, सर्व शासकीय अधिकारी या विषयी बैठक घेणार आहे. त्यात गरीब कल्याण योजना त्या-त्या समाजाला लागू झाल्या की नाही, याबाबतही चर्चा होणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना लोकांपर्यत पोहोचवणे हा मुळ उद्देश या प्रवास दौऱ्याचा आहे.

भाजपचे 'मिशन बारामती'

आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली असून, विरोधकांच्या बालेकिल्ल्यातून भाजपने आपल्या मिशनची सुरुवात केली आहे. त्यात शरद पवारांचा बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यासाठी भाजपकडून कसोसीने प्रयत्न केले जात आहेत. भाजपने मिशन बारामतीची सुरुवात केली असून, देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण देखील तीन दिवस बारामतीच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्याआधी आज चंद्रशेखर बावनकुळे हे बारामती दौऱ्यावर आहेत. कनेरीच्या हनुमान मंदिरात नारळ फोडून आज दौऱ्याची सुरुवात होणार आहे.

भाजपकडून कसोसीने प्रयत्न

1967 साली शरद पवारांनी याच मंदिरातून नारळ फोडून पहिल्यांदा निवडणूक लढवली होती. त्यानंतर त्यांच्या विजयाचा सिलसिला सुरू झाला आहे. तेव्हापासून अखंडपणे पवार कुटुंबियांचा विजय होताना पाहायला मिळत आहे. मात्र आता तो विजय खंडीत करण्यासाठी भाजपकडून कसोसीने प्रयत्न सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवरच ही भाजपची 'मिशन बारामती' मोहिम आहे.

मिशन 16 मतदारसंघ

अनेक नेते या मिशनसाठी बारामतीत दाखल झाले असून, त्यात गोपीचंद पडळकर देखील तयारीसाठी सकाळपासून गुंतले आहेत. ते म्हणाले की, "हा फक्त बारामतीचा विषय नाही, इतर 16 मतदारसंघात आम्ही काम करत आहोत. त्यात बारामती, शिरूर, कोल्हापूर आणि हातकनंगलेचा समावेश आहे. त्याचाच एक भाग म्हणून केंद्राकडून एक प्रभारी देखील निवडण्यात आला असून, निर्मला सीतारमण यांच्याकडे बारामतीची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यापार्श्वभूमीवर येत्या 22, 23 आणि 24 सप्टेंबरला सीतारमण बारामतीच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्याच्या पूर्व तयारीसाठी चंद्रशेखर बावनकुळे बारामतीत येत आहे."

बारामती आता आमचीच

पुढे पडळकर म्हणाले की, "2014 लोकसभा निवडणुकीत बारामती जिंकल्यात जमा होती. मात्र, थोड्यामुळे आपण ती हरलोय. आता मात्र निश्चितपणे सर्वांना सोबत घेऊन आम्ही बारामती जिंकणार आणि भाजपचा झेंडा फडकणार"

बातम्या आणखी आहेत...