आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोरोनाचा विळखा:भाजप आमदार अभिमन्यू पवार यांना कोरोनाची बाधा, मुलालाही झाला संसर्ग, ट्विटरवरुन दिली माहिती 

लातूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भाजप आमदार अभिमन्यू पवार यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यांच्यासह त्यांचा मुलगा परिक्षीत या दोघांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. अभिमन्यू पवार हे लातूरमधील औसा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून याविषयी माहिती दिली आहे. 

“मला हलकासा ताप/खोकला जाणवत असल्याने मी व माझ्या कुटुंबीयांनी कोरोना चाचणी केली होती .मी व माझा मुलगा परिक्षीत आम्हा दोघांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याने आम्ही वैद्यकीय तज्ञांच्या सल्ल्यानुसार उपचारासाठी रुग्णालयात दाखल झालो आहोत” अशी माहिती त्यांनी ट्विटरवरुन दिली आहे.

अभिमन्यू पवार हे लातूरमध्ये भाजयुमोचे ते नेते आहेत. यासोबतच त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक म्हणूनही आधी काम पाहिले आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत लातूरमधील औसा मतदारसंघातून भाजपकडून ते निवडून आले. 

0