आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंभाजी महाराजांना जे धर्मवीर मानत नाही, त्यांची सुंता झाली असेल, जाऊन पाहा. असे वक्तव्य भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याविषयी बोलताना आता गोपीचंद पडळकर यांची जीभ घसरली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा नवीन वादाला तोंड फुटले असून येणारे काही दिवस हा वाद वाढतच जाणार असल्याचे दिसून येत आहे.
विधानसभा विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते, ते स्वराज्य रक्षक होते, असे विधान केले होते. यावरुन मोठ्या प्रमाणावर वादा निर्माण झाला होता. भाजपसह, शिंदे गटाकडूनही अजित पवार यांना लक्ष्य करण्यात आले होते.
संभाजी महाराज धर्मवीर की स्वराज्यरक्षक यावरुन अजित पवार यांनी केलेल्या विधानानंतर राज्यातील वातावरण ढवळून निघाले होते. गल्लीपासून दिल्लीपर्यंत अजित पवार यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत होती. मात्र काही दिवसांनंतर नवीन वादाला तोंड फुटताच अजित पवार यांचे वक्तव्य विरोधकांच्या विस्मरणात गेले. मात्र गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा शमलेल्या वादात ठिणगी टाकली आहे.
गोपीचंद पडळकरांचे वक्तव्य
गोपीचंद पडळकर म्हणाले, संभाजी महाराज धर्मवीर नसते जे कोणी असे म्हणत आहेत असे म्हणणाऱ्यांची कदाचित 'सुंता' झाली असती. त्यांना जर तसे वाटत असेल तर प्रसारमाध्यमांच्या मित्रांना माझी विनंती आहे की, त्यांनी तिथे जाऊन खरी परिस्थिती काय आहे? हे तपासावे. ते पुण्यातील एका कार्यक्रमात बोलत होते.
नेमके काय म्हणाले होते पवार?
अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत वक्तव्य केले होते. त्यावेळी प्रचंड गदारोळ माजला होता. अजित पवार म्हणाले होते, छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते, त्यांना धर्मवीर म्हणू नका. त्यांना कोणत्याही एका धर्माशी जोडणे उचित ठरणार नाही, असे अजित पवार यांनी म्हटले होते.
गोप्या बोल म्हणले की..
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी गोपीचंद पडळकरांना प्रत्युत्तर दिले आहेे. त्या म्हणाल्या, गोप्या बोल म्हणले की गोप्या पवार पवार करतो. भाजपने गोपीचंद पडळकर यांना तुकडा टाकलेला आहे.. फक्त पवार कुटुंबिय यांच्यावरच बोलायचे. पवार साहेबांच्या परिवारावर भुंकण्यासाठी पडळकर यांना ठेवले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.