आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियमांची पायमल्ली:भाजप आमदाराला कोरोना नियमांचा विसर, मुलीच्या लग्नात बेभान डान्स आणि भंडारा उधळण; आमदारांसह 60 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना नेत्यांकडून वारंवार होत आहे. पण, जर नेतेच नियम मोडत असतील, तर काय करावे. कोरोना नियम मोडल्यावर सामान्यांवर कारवाई होते, पण अशा नेत्यांवर कुठलीच कारवाई होताना दिसत नाही.

लग्न समारंभात आणि इतर सोहळ्यात 25 नागरिकांनाच उपस्थित राहण्याचे आदेश असताना भाजपच्या आमदाराने स्वतःच्या मुलीच्या लग्नाच्या हळदीच्या कार्यक्रमात नियमाचे तीन तेरा वाजवल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी आमदारासह इतर 60 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपरी चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष आणि भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांचा बेफाम नाचतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यांची कन्या साक्षी लांडगे यांचा येत्या 6 जूनला विवाह आहे. त्यापूर्वी, आयोजित मांडव टहाळ कार्यक्रमात आमदार लांडगे यांच्याकडून भंडाऱ्याची उधळण करण्यात आली. यावेळी लांडगेंनी बेफाम होऊन डान्स केला.

त्यांच्यासोबत माजी महापौर आणि अन्य राजकीय नेते देखील उपस्थित होते. यावेळी कुणीच कोरोना नियमांचे पालन केले नाही. या बाबत पोलिस प्रशासनाला कोणतीही माहिती अद्याप मिळाली नाही. त्यामुळे आता व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिस प्रशासनाने आमदारांसह 60 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

बातम्या आणखी आहेत...