आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपने रडीचा डाव खेळला:नीलम गोऱ्हेंची टीका- म्हणाल्या अंधेरी निवडणुकीत नोटा नावाच्या बेडकीचा बैल करण्याचा खोटा डाव उलटवला

पुणे21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नोटा म्हणजे एक प्रकारे शिवसेनेच्या विजयाला कलंकित करण्याचा प्रयत्न होता. हे प्रयत्न कुणी केले हे सर्वांसमोर आहे. या प्रकारची निवडणूक ही संवेदनशील पद्धतीने लढवली जाते. अशावेळी जातीच्या प्रमाणपत्राचा निकाल ज्यांच्या विरुद्ध गेला अशा नेत्यांना पुढे करून भाजपने रडीचा डाव खेळला हे अगदी स्पष्ट आहे अशी टीका विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे​​​​​​ यांनी आज केली.

ही प्रेमाची पावती

अंधेरी पोटनिडणुकीत ऋतुजा लटके यांना मिळालेला भरघोस पाठिंबा ही उद्धव ठाकरे यांच्यावरील मुंबईकरांच्या असलेल्या प्रेमाची आणि विश्वासाची पावती असल्याचे उद्गगार निलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.

येथील कसबा मतदार संघातील धडाडीचे नगरसेवक विशाल धनवडे यांनी दिवाळीनिमित्त आयोजित केलेल्या दिवाळी फराळ आणि स्नेहमिलनाच्या कार्यक्रमात पत्रकारांशी डॉ. गोऱ्हे यांनी संवाद साधला.

यामागे कोण माहीतेय

नोटा म्हणजे एक प्रकारे शिवसेनेच्या विजयाला कलंकित करण्याचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन करताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, यामागे कोणी प्रयत्न केले हे सर्वांसमोर आहे. या प्रकारची निवडणूक ही संवेदनशील पद्धतीने लढवली जाते. अशावेळी जातीच्या प्रमाणपत्राचा निकाल ज्यांच्या विरुद्ध गेला अशा नेत्यांना पुढे करून भाजपने रडीचा डाव खेळला हे अगदी स्पष्ट आहे.

हा कौल ठाकरेंना

लटके यांचा विजय म्हणजे उद्धव ठाकरेंसोबत जनतेची सहानुभूती आणि पाठिंबा कायम असल्याचा कौल मुंबईकरांनी आज दिला असल्याचे प्रतिपादन करताना, डॉ. गोऱ्हे असेही म्हणाल्या की विद्यमान सरकारच्या कामकाजाबाबत जनतेमध्ये असलेली नकारात्मकता त्यांनी मतपेटीच्या माध्यमातून दर्शविलेली आहे.

याप्रसंगी, शिवसेना पुणे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन पंडित, चंदन साळुंखे, संजय गायकवाड, जावेद खान आदी शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक आणि नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

ऋतुजा लटके यांचा दणदणीत विजय

ऋतुजा लटके यांना दिवंगत पती आमदार रमेश लटके यांच्यापेक्षाही जास्त मते या निवडणुकीत मिळाली आहे.

भाजप-शिवसेना युती असताना 2019 ला रमेश लटके याना 62 हजार 227 मते होती.मात्र ,ऋतुजा लटके याना शिवसेना आणि काँग्रेस,राष्ट्रवादी मिळून 65 हजारांच्या वर मते मिळाली आहेत. भाजपने यापूर्वीच त्यांचा उमेदवारी अर्ज या निवडणुकीत माघारी घेतलेला होता.

बातम्या आणखी आहेत...