आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

पुणे:भाजपने शरद पवारांना, तर राष्ट्रवादीने व्यंकय्या नायडूंना पाठवले पाेस्टकार्ड

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे येथील टपाल कार्यालयाच्या प्रांगणात जमून भारतीय जनता युवा माेर्चाच्या वतीने खा. शरद पवार यांना २५,००० पत्रे पाठवण्याचा संकल्प साेडण्यात आला
  • शरद पवार यांना प्रभू श्रीरामाची आठवण करून देण्यासाठी 25,000 पत्रे पाठवण्याचा संकल्प

अयोध्या येथील प्रभू रामचंद्रांच्या मंदिर निर्माणाचा शुभारंभ ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असून यानिमित्ताने संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण आहे. या विषयात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी वादग्रस्त विधान करत समस्त रामभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. राम मंदिर बांधल्याने कोरोना जाणार आहे का? अशा सर्व हिंदू समाजाच्या भावनिक श्रद्धेला ठेच पोहोचवणारी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष तथा खा. शरद पवार यांनी केली. खा. शरद पवार यांना प्रभू श्रीरामाची आठवण करून देण्यासाठी “जय श्रीराम’ अशा मजकुराची २५,००० पत्रे पाठवण्याचा संकल्प भारतीय जनता युवा मोर्चा पुणे शहराच्या वतीने करण्यात आल्याचे भाजप युवा मोर्चा पुणे शहराचे अध्यक्ष नगरसेवक दीपक पोटे यांनी सांगितले.

युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्या नेतृत्वाखाली युवकांची घोषणाबाजी...
मुंबई । राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी भाजपचे खासदार उदयनराजे भाेसले यांना ‘जय शिवाजी जय भवानी’ची घाेषणा दिल्याबद्दल राज्यसभेत समज दिली. सभागृहात काेणत्याही घाेषणा द्यायच्या नसतात अशी समज नायडू यांनी दिली. आता घटनेचे राजकीय पडसाद राज्यात उमटत आहे. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने शुक्रवारी नवी मुंबई येथे पोस्ट अॉफिसमध्ये जावून उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्रे पाठवण्यात आली. यावेळी ‘जय भवानी जय शिवाजी’ अशा घोषणा देत युवक पदाधिकाऱ्यानी ‘जय भवानी जय शिवाजी’ लिहिलेली पोस्ट कार्ड व्यंकय्या नायडू यांना पत्र पेटीतून पाठवली. आज नवी मुंबई येथे पोस्ट अॉफिसच्या बाहेर राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्या नेतृत्वाखाली ही पोस्ट कार्ड पाठवण्यात आली. या वेळी युवक पदाधिकारी प्रशांत पाटील, तेजस शिंदे, गौतम आगा, राजेश भोर, योगेश काळे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.