आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • MP Kolhe Got Angry With The BJP Spokesperson's Statement On Shivaji Maharaj, Said What Exactly Is Wrong With Shivaraya?; BJP Should Clarify Its Position Towards Maharaj

भाजप प्रवक्त्याच्या विधानाने खासदार कोल्हे संतापले:म्हणाले - शिवरायांबद्दल नेमके खुपते तरी काय?; भाजपने भूमिका स्पष्ट करावी

पुणे13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

खासदार अमोल कोल्हे यांनी शिवाजी महाराजांवर भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. कोल्हे म्हणाले की, भाजपला शिवरायांबद्दल नेमके खुपते तरी काय? माणूस हा धर्मासाठी नसून धर्म हा माणसासाठी आहे, हे शिवरायांनी अधोरेखित केले ते भाजपला खुपते का? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.

अमोल कोल्हे म्हणाले?

अमोल कोल्हे म्हणाले की, सुधांशू त्रिवेदीजी, छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातीच्या मावळ्यांच्या मदतीने औरंग्याला फरफट करून या महाराष्ट्रात गाडलं, हाच खरा इतिहास आहे. तुमच्या दळभद्री वक्तव्याचा जाहीर निषेध! छत्रपती शिवराय आमची अस्मिता आहे, तिला कोणीही डिवचू नये! अशा शब्दांत त्यांना खडसावले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते असो की राज्यपाल वादग्रस्त बोलतात. अमोल कोल्हे यांनी फेसबुक पोस्ट करून म्हटलं की, डॉ. सुधांशू त्रिवेदीजी, छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातीच्या मावळ्यांच्या मदतीने औरंग्याला फरफट करून या महाराष्ट्रात गाडले. हाच खरा इतिहास आहे. तुमच्या दळभद्री वक्तव्याचा जाहीर निषेध! छत्रपती शिवराय आमची अस्मिता आहे, तिला कोणीही डिवचू नये, अशा शब्दात कोल्हे यांनी भाजपला खडसावले.

त्रिवेदी यांचे वक्तव्य काय?

भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी एका वृत्त वाहिनीच्या मुलाखतीत छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केले आहे. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. "शिवाजी महाराजांनी 5 वेळा औरंगजेबाची पत्र लिहून माफी मागितली होती असं वादग्रस्त विधान त्रिवेदी यांनी केलं आहे.

बातम्या आणखी आहेत...