आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे:खुर्चीसाठी धडपड करून सरकार चालवण्याचा केविलवाणा प्रयत्न - भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाविकास आघाडी सरकारमधील घटकांनी सत्ता टिकवण्यासाठी वाट्टेल ते अपमान सहन केले व केवळ खुर्चीसाठी धडपड करून मागील वर्षभर सरकार चालवण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेतकरी प्रश्न, महिलांचे रक्षण, मराठा आरक्षण, काेराेनाचा मुकाबला करण्यात सरकार अपयशी ठरले असून सर्वसामान्य माणूस भरडला गेल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी पुण्यात केली. मुख्यमंत्री ज्याप्रकारे जाहीरपणे धमकीची भाषा वापरतात, अशी भाषा राज्यातील काेणत्याही मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी वापरलेली नाही. दसरा मेळावा व सामनाच्या मुलाखतीत त्यांनी अशाच प्रकारची भाषा वापरलेली असून ती त्यांना शाेभत नाही, आम्ही त्यांच्या अशा भाषेस घाबरत नाही. काय करायचे आहे ते करा, यासारख्या धमक्या कशाला देत आहेत.

वाढीव वीजबिले, मंदिरे उघडणे, शेतकऱ्यांचे प्रश्न, दूध उत्पादकांचे प्रश्न अशा अनेक मुद्द्यांवर आम्ही संघर्ष केला असून ताे पुढे सुरूच ठेवणार आहोत. भाजपकडून कधीही देवेंद्र फडणवीस अथवा भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून मी महाविकास आघाडी सरकार पाडणार, असे वक्तव्य केलेले नाही. तीन पक्षांतील आपआपसातील विसंवादामुळे ते पडेल, असे म्हटल्याचे ते म्हणाले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser