आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उघड दार उद्धवा:कोराेनामुळे बंद करण्यात आलेली मंदिरे उघडण्यासाठी भाजपचे नाशिक, पुणे, शिर्डीसह अनेक शहरांत आंदोलन

पुणे/नाशिक / शिर्डी/ कोल्हापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे येथील कसबा गणपती येथे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मंदिरे खुली करण्याच्या मागणीसाठी शंखनाद करण्यात आला. - Divya Marathi
पुणे येथील कसबा गणपती येथे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मंदिरे खुली करण्याच्या मागणीसाठी शंखनाद करण्यात आला.

कोराेनामुळे बंद करण्यात आलेली मंदिरे सुरू करण्याच्या मागणीसाठी भाजपच्या आध्यात्मिक समन्वय आघाडीतर्फे सोमवारी नाशिक, पुणे, शिर्डी, कोल्हापूर, मुंबईसह राज्यभरात आंदोलन करण्यात आलेे. पुण्यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपती येथे शंखनाद आंदोलन करण्यात आले. “सरकार मंदिरे सुरू करणार नसेल तर आम्हालाच मंदिरे सुरू करावी लागतील. कुलूप तोडून लोक मंदिरे खुली करतील, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला. धार्मिक स्थळे बंद असतील तर सर्वांनी पूजा-प्रार्थनेसाठी काय मातोश्रीवर जायचं का?’ असा संतप्त सवालही त्यांनी केला.

पाटील म्हणाले, मी इशारा देतो आज दिवसभरात मंदिर उघडा. नियम करून का होईना मंदिरे उघडली नाही तर आजपासून लोक त्यांच्या भावना काबूत ठेवणार नाहीत. ते मंदिराचे कुलूप तोडून मंदिरात घुसतील. मंदिरात जाण्यापासून हे सरकार नागरिकांना थांबवू शकणार नाही. मंदिरे उघडल्याने तिसरी लाट येऊ शकते तर दारूच्या दुकानांना तिसऱ्या लाटेची भीती नाही का? असा प्रश्नही पाटील यांनी यावेळी उपस्थित केला.

नाशकात रामकुुंड परिसरात शंखनाद : मंदिरे खुली करण्याठी भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भाेसले यांच्या नेतृत्वाखाली रामकुंड परिसरात साेमवारी शंखनाद आंदाेलन करण्यात आले. या वेळी मंदिर हम खुलवायेंगे.... धर्म काे न्याय दिलायेंगे अशा जाेरदार घाेषणा देण्यात आल्या. आंदाेलनात भाजपच्या आमदार सीमा हिरे, शहराध्यक्ष गिरीश पालवेंसह माेठ्या संख्येने साधू, महंत, नागरिक सहभागी झाले हाेते.

साईंच्या महाद्वारी शंखनाद : शिर्डी येथे हजारोंना रोजी-रोटी व कोट्यवधी भाविकांना जगण्यासाठी आत्मिक बळ देणारे साईमंदिर खुले करावे, अशी मागणी करत शिर्डीत साईमंदीराच्या महाद्वारासमोर शंखनाद आंदोलन करण्यात आले. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, शहराध्यक्ष सचिन शिंदे, किरण बोऱ्हाडे, रवींंद्र गोंदकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

कोल्हापुरात अंबाबाई मंदिरासमोर आंदोलन : कोल्हापूर येथे अंबाबाई मंदिरासमोरील महाद्वार चौकामध्ये “मंदिरे उघडा” यासाठी शंखनाद आंदोलन करण्यात आले. मंदिराच्या बंद दारासमोर उभे राहून कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. या वेळी भाजपा प्रवक्ते धनंजय महाडिक, भाजप प्र.का.सदस्य महेश जाधव, जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, संघटन सरचिटणीस अशोक देसाई, विजय जाधव, दिलीप मेत्राणी, गणेश देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.

गणेशोत्सव साजरा होणार
गणेशोत्सव हा आपापल्या ठिकाणी छोटा का होईना लोक करणारच आहेत. गणेशोत्सव साजरा होणारच आहे. कोरोनाचे नियम पाळून गणेशोत्सव साजरा होईल. मंदिर बंद करण्याचा त्याचा काय संबंध? भविष्यात काय होईल याची काळजी घेतली पाहिजे. ती केवळ भाविकांनीच घ्यायला हवी असे नाही, असा टोला पाटील यांनी लगावला.

बातम्या आणखी आहेत...