आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय:राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या बदनामीचे भाजपचे षड‌्यंत्र : जयंत पाटील

पुणे9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय जनता पक्षाकडून राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बदनामीचे षड‌्यंत्र रचले जात असून केंद्रीय यंत्रणाच सध्या भाजपला चालवत आहेत, असा आराेप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुरुवारी पत्रकारांशी बाेलताना केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित साखर कारखान्यांच्या संचालकांचे घरावर आयकर विभागाने गुरुवारी पहाटेच छापे टाकल्याप्रकरणी त्यांनी भाजपवर हल्लाबाेल केला.

पाटील म्हणाले, भाजपचे पुढारी आमच्या नेत्यांचे नाव घेतात व ्यानंतर लगेच त्यापाठाेपाठ केंद्रीय यंत्रणा ईडी, सीबीआय, आयकर विभागाची कारवाया सुरू हाेतात. आमच्या नेत्यांना बदनाम करण्याचे षड‌्यंत्र भाजपचे असून यात काही शंका नाही. भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा इतका धसका का घेतला आहे हे विचार करणारी गाेष्ट आहे. आमचा कायद्यावर विश्वास असून मंत्री छगन भुजबळ यांना ही अशाच प्रकारे त्रास देण्यात आला. शेवटी न्यायालयाने त्यांना न्याय दिला.

बातम्या आणखी आहेत...