आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना शह देण्यासाठी सातत्याने बारामती मतदारसंघाचे निमित्त पुढे करून आव्हान दिले जात आहे. आता याच बारामती मतदारसंघात दुसऱ्यांदा अर्थमंत्री निर्मला सितारामन यांचा दौरा होणार आहे. लोकसभेची पुर्वतयारी म्हणून हा दौऱ्याकडे पाहिले जात असून केंद्रीय संघटन बांधणी करण्यासाठी केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्याेग आणि जल शक्ती राज्यमंत्री प्रल्हास सिंग पटेल 11 व 12 नाेव्हेंबर राेजी बारामती मतदारसंघाचा दाैरा करणार आहेत.
वर्चस्वासाठी भाजपची लढाई
भारतीय जनता पक्षाने आगामी लाेकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख खासदार शरद पवार यांचा बालेकिल्ला असलेला बारामती लाेकसभा मतदारसंघावर वर्चस्व निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे या मतदारसंघाची जबाबदारी साेपविण्यात आली. सीतारामन यांनी बारामतीत 3 दिवसांचा दाैरा पूर्ण केला हाेता. यानंतर पुन्हा डिसेंबर महिन्यात 3 दिवसांचा बारामती लाेकसभा दाैरा त्या करणार आहेत.
दाैऱ्यासाठी पूर्वतयारी
सितारामन यांच्या दौऱ्याचा भाग म्हणून आणि पुर्वतयारीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्र्यांना पाचारण करण्यात येणार आहे. याबाबतची माहितीच भाजप पुणे जिल्हा उपाध्यक्ष राहूल शेवाळे आणि संघटन सरचिटणीस धर्मेंद्र खांडारे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी राजेंद्र भिंताडे, प्रशांत काेतवाले, जनार्दन दांडगे उपस्थित हाेते.
6 मतदारसंघात दौरा
शेवाळे म्हणाले, बारामती लाेकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघात केंद्रीय राज्यमंत्री दाैरा करणार आहे. यात ते काेअर टिम लाेकसभा, विधानसभा बैठक, कार्यकर्ता मेळावा, शेतकरी व महिला बचत गट मेळावा, कार्यकर्त्यांच्या भेटी, चर्चा करणार आहे. मतदारसंघातील संघटन सक्षमीकरणावर भर दिला जात असून निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व बूध रचना नियुक्ती पूर्ण करण्यात आली आहे.
केंद्रीय मंत्र्यांसोबत भाजपची फौज
केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल यांच्या साेबत दाैऱ्यात बारामती लाेकसभा मतदारसंघाचे प्रभारी आमदार राम शिंदे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, सुनील कर्जतकर, माजी राज्यमंत्री संजय भेगडे, वासुदेव काळे, जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे, आमदार राहूल कुल, आमदार भीमराव तापकीर, अविनाश माेटे हे असतील.
केंद्रीय राज्यमंत्र्यांचा दौरा
11/11/2022
12/11/2022
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.