आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • BJP's Preparation In 288 Constituencies BJP Workers Should Focus On Booth Empowerment In Upcoming Elections; Appeal Of Shiv Prakash

भाजपची 288 मतदारसंघात तयारी:आगामी निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांनी बूथ सक्षमीकरणावर भर द्यावा; शिवप्रकाश यांचे आवाहन

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आगामी निवडणुकांमध्ये बूथ जिंकले तर निवडणूक जिंकू असा कानमंत्र भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना संघटनात्मक बैठकीत दिला आहे.

शिवप्रकाश हे सध्या पश्चीम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत सोमवारी रात्री पुण्यात झालेल्या सुकाणू समितीच्या बैठकीत ते बोलत होते. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात बूथ वर लक्ष्य केंद्रित करून त्यावर जास्तीत जास्त भर द्या. बूथ सशक्तीकरणावर भर देऊन बूथ वरील कार्यकर्त्यांच्या मार्फत मतदारांच्या पर्यंत केंद्र सरकारच्या योजना आणि राज्य सरकारच्या योजना पोहचविण्यासाठी भर दिला पाहिजे. तसेच बूथ जिंकता आले तर निवडणूक देखील जिंकता येते असे प्रतिपादन शिवप्रकाश यांनी केले आहे.

पश्चिम महाराष्ट्राच्या पुणे, सातारा, सांगली कोल्हापूर जिल्हाच्या विभागवार बैठका सध्या पुण्यात तसेच कोल्हापूर या ठिकाणी सुरू आहेत.यावेळी पुण्यात शिवप्रकाश यांनी भारतीय जनता पक्षातील विविध पदाधिकाऱ्यांशी सवांद साधला. यावेळी पश्चिम महाराष्ट्राचे संघटन मंत्री मकरंद देशपांडे, सुनील कर्जतकर, योगेश बाचल यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील सुकाणू समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. शिवप्रकाश यांनी पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ,केसरीवाडा गणपती ट्रस्ट या ठिकाणी भेट देऊन तेथील पदाधिकाऱ्यांच्या समवेत वार्तालाप केला.

यावेळी आमदार सुनील कांबळे,सिद्धार्थ शिरोळे, माधुरी मिसाळ, माजी आमदार मेधा कुलकर्णी,पुणे शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे, सरचिटणीस गणेश घोष ,राजेश येनपुरे,दत्ता खाडे,संदीप लोणकर,दीपक पोटे गणेश बिडकर,हेमंत रासने पुष्कर तुळजापूरकर यांनी शिवप्रकाश यांचे स्वागत केले.

राज्यात भाजपचे 25 लाख ‘युवा वॅारीयर्स’चे लक्ष्य

भाजपने पुढील विधानसभा निवडणूक तयारी आत्तापासून जोमाने सुरु केली आहे. भाजपने राज्यभर मिशन युवा मतदार सुरु केले असून, 288 विधानसभा मतदारसंघात प्रत्येक बूथवर भाजप 18 ते 25 वयोगटातील 25 युवा वॅारियर्स नेमणं सुरु केले. राज्यभरात भाजपचे 25 लाख ‘युवा वॅारीयर्स’ नेमण्याचं काम सुरु झाल्याचे नुकतेच भाजप नेत्याकडून सांगण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...