आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्तव्य:कुटुंबासोबत जञेला निघाला होता अग्निशमन जवान, रस्त्यात बीएमडब्ल्यूला लागलेली आग विझवली

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उंड्री पिसोळी परिसरात धर्मावत पेट्रोल पंपासमोर मंगळवारी रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास एका बीएमडब्ल्यू कारला अचानक आग लागल्याची घटना रस्त्यावर घडली . यावेळी जत्रेला कुटुंबासमवेत निघालेल्या एका अग्निशामक जवानाने याठिकाणी थांबून आग विझवण्याचा प्रयत्न करत अल्पावधीत आग आटोक्यात आणली. या जवानाचे कौतुक होत आहे.

अग्निशामक दलाने दिलेल्या माहितीनुसार, धर्मावत पेट्रोल पंपासमोर आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात मिळताच, अग्निशामक दलाकडून कोंढवा बुद्रुक अग्निशमन वाहन व वॉटर टँकर रवाना करण्यात आले होते.

प्रथम पाहणी केली

परंतु, या घटनास्थळी तेथील रहिवाशी असलेले व कोंढवा खुर्द अग्निशमन केंद्रात ड्युटी करणारे अग्निशमन दलातील जवान हर्षद येवले हे आपल्या कुटुंबासमवेत सातारा रस्ता, केंजळ गाव येथे जञेकरिता चारचाकी वाहनातून जात होते. त्यावेळी त्यांना एका कारने मोठ्या प्रमाणात पेट घेतल्याचे दिसताच, त्यांनी तत्परतेने आगीच्या दिशेने धाव घेत गाडीत कोणी अडकले आहे का याची प्रथम पाहणी केली.

कर्तव्य पार पाडले

त्यानंतर जवानाने धर्मावत पेट्रोल पंप येथील अग्निरोधक उपकरण वापरुतन बीएमडब्ल्यु-एक्सवन या पेटलेल्या वाहनाची प्राथमिक स्वरुपात आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी तिथे अग्निशमन वाहन पोहोचताच, जवानांनी पाण्याचा मारा करत आग पुर्ण विझवली. अग्निशमन दलाचे कार्य पार पडताच उपस्थित नागरिकांनी व कुटुंबिय यांनी जवान हर्षद येवले व इतर जवानांचे ही कौतुक केले.

या कामगिरीत देवदूत जवान हर्षद येवले तसेच कोंढवा बुद्रुक अग्निशमन केंद्र येथील वाहनचालक बाबुराव जाधव, अक्षय खरात व तांडेल सोपान कांबळे आणि जवान अभिजित थळकर, अर्जुन यादव, साहिल पडये, अनिल चव्हाण यांनी सहभाग घेतला.