आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन मृतदेह:पुण्यात खाणीत सापडले दोन तरुणांचे मृतदेह; पोलिसांकडून तपास सुरू

पुणे17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातील विश्रांतवाडी येथील खाणीत दोन तरुणांचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ शनिवारी उडाली आहे. विकी लंके (२०) आणि प्रसन्न थुल (२०) अशी मृतांची नावे आहेत.

विकी आणि प्रसन्न यांचा खून झाला असल्याचा आरोप मृतांच्या नातेवाइकांनी केला आहे. ६ जूनला रात्री विकी आणि प्रसन्न बेपत्ता झाले होते. याबाबत विश्रांतवाडी पोलिस स्टेशनमध्ये हे दोघे बेपत्ता झाल्याची तक्रारही नातेवाइकांनी दिली होती. पण गेली काही दिवस त्यांचा ठावठिकाणा लागला नाही. मात्र, दोघांचेही मृतदेह खाणीत आढळले. दरम्यान, या दोघांनी आत्महत्या केली की त्यांचा खून करण्यात आला, याचा तपास तपास करत असल्याचे सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...