आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुनाचा प्रकार:बेपत्ता वकिलाचा मृतदेह तेलंगणा सीमेवर सापडला, मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

३१ डिसेंबर राेजी दुपारी काळेवाडी परिसरातून बेपत्ता झालेले पिंपरी चिंचवड शहरातील वकील शिवशंकर शिंदे यांचा खून झाल्याचे उघड झाले आहे. महाराष्ट्र -तेलंगणा सीमेवर मदनूर येथे त्यांचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह साेमवारी मिळून आल्याने खळबळ उडाली आहे.

अॅड. शिवशंकर शिंदे यांचे पिंपरी चिंचवड शहरात काळेवाडी येथे ऑफीस आहे. ऑफीसमध्ये ३१ डिसेंबर राेजी ते काम करत बसले हाेते. त्यानंतर दुपारच्या सुमारास अचानक ते बेपत्ता झाले. ते मिळून येत नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तसेच सर्वत्र शाेध घेण्यात आला परंतु ते मिळून आले नाही. अखेर त्यांनी ते बेपत्ता झाल्याची तक्रार वाकड पाेलिस ठाण्यात दिली हाेती. शिंदे यांचा पाेलिसांनी शाेध सुरू केल्यानंतर त्यांच्या कार्यालयात घटनेच्या दिवशी एका अज्ञात व्यक्तीशी व्यावसायिक वादातून झटापटी झाल्याची माहिती मिळाली आहे. त्याअनुषंगाने पाेलिस अधिक तपास करत असताना अचानक महाराष्ट्र- तेलंगणा सीमेवर अॅड.शिंदे यांचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह मिळून आल्याने खळबळ उडाली आहे. या बाबत अधिक तपास वाकड पाेलिस करत आहेत. गुन्हे शाखेची पथके सदर भागातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करत आराेपीचा माग काढण्याचा प्रयत्न करत आहे.

बातम्या आणखी आहेत...