आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिल्म बनवण्यासाठी उघडली बोगस फायनान्स कंपनी:यु-ट्युबवर प्रसिद्ध डान्सर जोडप्याला पुणे पोलिसांनी केली सुरतमधून अटक

पुणे11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गाजलेल्या गाण्यांमधील डान्सर जोडप्याला पुणे पोलिसांनी सुरतमधून अटक केली आहे. यु-ट्युबवर या जोडप्याचे जबरदस्त फॅन फॉलोअर्स असून त्यांनी फिल्म बनविण्यासाठी पैसे कमी पडत असल्याने पुण्यात येऊन एक बोगस फायनान्स कंपनी उघडून त्याद्वारे शंभरहून अधिक नागरिकांना गंडा घातला आहे. स्वारगेट पोलिसांनी या पसार झालेल्या जोडप्याला बेड्या ठोकल्या आहेत.

दिपाली जितेंद्र पौनिकर (वय 32) आणि हेमराज जिवनलाल भावसार (वय 28) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. दिपाली व हेमराज हे लिव्हइनमध्ये राहतात. मुळचे ते खानदेशातील आहेत. त्यांचे यु-ट्युब व इन्स्टाग्रामवर मोठा फॅन फॉलोवर आहे.

फसवणूकीचा मार्ग

त्यांनी अनेक गाजलेल्या गाण्यांवर डान्स देखील केलेला आहे. दरम्यान, त्यांना एक फिल्म बनवायची होती. त्याच्या शुटींगला पैशांची गरज होती. त्यामुळे त्यांनी फसवणूकीचा मार्ग पत्कारला, अशी माहिती स्वारगेट पोलिसांकडून देण्यात आली आहे.

पैसे उकळले

दोघांनी स्वारगेटमधील मुकुंदनगर भागात एक मानधन मायक्रो फायनान्स कंपनी सुरू केली. त्यामाध्यमातून येणाऱ्या नागरिकांना तत्काळ कर्ज देऊन असे सांगितले. एक लाखांच्या कर्जासाठी आधी दहा हजार रुपये द्यावे लागतील अशी बतावणी त्यांनी केली. त्यानंतर प्रत्येक येणाऱ्याकडून कर्ज देण्याच्या बहाण्याने पैसे उकळले. त्यांनी जवळपास शंभर पेक्षा अधिक नागरिकांना फसविले आहे.

एसआरए इमारतीत राहत होते

आतापर्यंत त्यांनी 28 जणांकडून 12 लाख 30 हजार रुपये घेतल्याचे समोर आले आहे. या नागरिकांकडून पैसे घेऊन दोघे फायनान्स कंपनीला कुलूप लावून पसार झाले होते. याप्रकरणी दोघांचा शोध घेण्यात येत होता. यावेळी स्वारगेट पोलिसांना ते गुजरातमध्ये असल्याचे समजले. त्यानुसार, वरिष्ठ निरीक्षक अशोक इंदलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अशोक येवले, पथकातील तारू, शेख, गायकवाड, महिला अंमलदार होळकर व त्यांच्या पथकाने सुरतमध्ये छापेमारीकरून त्यांना पकडले. दोघेही एका एसआरए इमारतीत भाड्याने खोली घेऊन राहत होते. तेथून त्यांना पकडले आहे.

सर्वत्र खळबळ

खानदेशात त्यांची जबरदस्त लोकप्रियता आहे. त्यांचे फॉलोअर्स देखील मोठे आहेत. त्यांच्या या फसवणूक प्रकरणाने मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, त्यांनी वेगवेगळ्या युट्युबवरील गाण्यांवर डान्स देखील केले आहेत. ही कारवाई परिमंडळ दोनचे उपायुक्त सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...