आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

म्हणून पुणेकर जगात भारी:पुणेच्या मेट्रोमध्ये पुस्तक प्रकाशन; काव्यसंमेलनानंकर ओटोपला पुस्तक प्रकाशाचा कार्यक्रम

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक कविता दिनानिमित्त काव्यशिल्प पुणे या संस्थेतर्फे मेट्रो प्रवासामध्ये कविसंमेलनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यादरम्यान सोमवारी पुणे मेट्रो मध्ये पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी पुणेकर जगात सर्वात भारी अशी ओळख त्यांची झाली. दिलीपराज प्रकाशनातर्फे संगणकतज्ञ डॉ. दीपक शिकारपूर लिखित ‘आपले डिजिटल जीवन’ या पुस्तकाचे प्रकाशन मेट्रो प्रवासात नियोजित संमेलनाध्यक्ष भारत सासणे यांच्या हस्ते झाले. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रकाशक राजीव बर्वे, मीना सासणे या वेळीउपस्थित होते.

प्रवाशांनीही केले या उपक्रमाचे स्वागत
यावेळी संगणक तज्ज्ञ असलेल्या डॉ. दीपक शिकारपूर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले,“आपले डिजिटल जीवन हे वेगळ्या स्वरूपाचे आहे. माझे पुस्तक आज मेट्रो सफर करताना प्रकाशित झाले याचा विशेष आनंद आज मला वाटतो आहे. येत्या काळात आपल्या जीवनात डिजिटल माध्यमामुळे जे बदल घडणार आहेत त्याची सविस्तर माहिती या पुस्तकात मी दिली आहे.

आणखी एक वेगळेपण म्हणजे प्रत्येक प्रकरणात क्यूआर कोड दिले आहेत. ते स्कॅन केल्यानंतर संबंधित विषयाचे व्हिडिओ तसेच अधिक माहितीही उपलब्ध होणार आहे मेट्रो ही आधुनिक जीवनशैली पुणेकरांनी अंगिकारली आहे. त्याला अनुषंगून या पुस्तकाचे प्रकाशन मेट्रो सफर करताना करण्यात आले आहे

बातम्या आणखी आहेत...