आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत- पाक क्रिकेट सामन्यावर सट्टा:पुण्यातील पबमधून बुकी ताब्यात; लाखो रुपयांची रोकड, मोबाईल जप्त

पुणे | प्रतिनिधी24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत- पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर लाखो रुपयांचा सट्टा लावणाऱ्या नामांकित बुकीला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. बंडगार्डन पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या डी मोरा पबमध्ये हा सट्टा लावण्यात आला होता.

पोलिसांनी बुकीकडून लाखो रुपयांची रोकड जप्त केली आहे. याशिवाय मोबाईल, सट्टा लावण्यासाठी आवश्यक साहित्यही ताब्यात घेतले आहे.

गुन्हे शाखेने रविवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. श्रीपाद यादव ( रा.पुणे) असे ताब्यात घेण्यात आलेल्या बुकीचे नाव आहे.

रात्री पोलिसांचा छापा

पुणे शहराच्या मध्यवस्तीतील डी-मोरा पबमध्ये भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर बेटिंग घेण्यात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने रात्री उशिरा पबमध्ये अचानक छापा टाकून श्रीपाद यादव या बुकीला ताब्यात घेतले.

कोट्यवधीचे व्यवहार

आरोपी पबमध्ये दोन्ही देशातील क्रिकेट सामन्यावर बुकिंग घेऊन सट्टा घेत असल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, ताब्यात घेण्यात आलेल्या बुकीकडून कोट्यवधी रुपयांचे व्यवहार उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही कामगिरी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलिस आयुक्त गजानन टोम्पे, सहायक पोलिस आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकांनी केली. याबाबत पुढील तपास बंडगार्डन पोलिस करत आहे.

बातम्या आणखी आहेत...