आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोपदेव घाटातील खून प्रकरण:पुणे पोलिसांनी 8 दिवसात लावला गुन्ह्याचा छडा; एकास अटक

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आर्थिक वादावादीमुळे तीन महिन्याच्या मुलाला जाळून टाकण्याची धमकी मित्राने दिली होती. त्याच रागातून नशेच्या भरात असलेल्या मित्राच्या डोक्यात दगड मारून खून करीत काटा काढणार्‍याला युनीट एकने अटक केली आहे.

ही घटना आठ दिवसांपूर्वी बोपदेव घाटात घडली होती. दरम्यान, घटनेचा कोणताही पुरावा नसतानाही, गुन्हे शाखेच्या पथकाने अतिशय चलाखीने तपास करून आरोपीला बेड्या घातल्या आहेत.

किरण भागवत थोरात (वय 26 रा. राजीव गांधीनगर बिबवेवाडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. धनंजय गायकवाड असे खून झालेल्याचे नाव आहे.

आठ दिवसांपूर्वी बोपदेव घाटात तरूणाच्या डोक्यात दगड मारून खून केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी स्थानिक पोलिसांसह युनीट एककडून तपास करण्यात येत होता. त्यावेळी पोलिस अंमलदार अजय थोरात यांना खूनी आरोपी चिंचवडीमधील डांगे चौकात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने किरण थोरात याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने खूनाच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. ही कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदिप कर्णिक, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, एसीपी गजानन टोम्पे वरीष्ठ पोलिस निरीक्षक संदीप भोसले, एपीआय आशिष कवठेकर, उपनिरीक्षक सुनिल कुलकर्णी, अजय थोरात, अमोल पवार, इम्रान शेख, राहुल मखरे, विठ्ठल सांळुखे, निलेश साबळे यांनी केली.

नोकरी लावण्याच्या अमिषाने फसवणूक

तरुणीला फुड कार्पोरेशन ऑफ इंडीया कंपनीमध्ये फुड इनस्पेक्टर म्हणून नोकरीस लावतो सांगून वेळोवेळी 4 लाख 39 हजार घेऊन कोणतीही नोकरी न लावता फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सौरव शर्मा (रा. अ‍ॅमनोरा पार्क, हडपसर,पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अशोक सिताराम मानवतकर (58, रा. मु. पो. बिबी, ता. लोणार, जि. बुलढाणा) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मानवतकर यांची मुलगी अनुराधा यांना फुड इन्स्पेक्टरची नोकरी लावण्याचे आमिष शर्मा यांनी दाखविल्यानंतर फेब्रुवारी 2022 ते 16 डिसेंबर 2022 दरम्यान हा प्रकार घडला आहे.

बातम्या आणखी आहेत...