आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकेतील बोस्टन सायंटिफिक कॉर्पोरेशनने अमेरिकेनंतर भारतात कंपनीचे सर्वात मोठे संशोधन केंद्र (आर अँड डी) निर्माण करण्याचे ठरवले आहे. गुरगाव येथे पहिले संशोधन केंद्र निर्माण केल्यानंतर पुण्यात मंगळवारी दुसरे अत्याधुनिक संशोधन केंद्र सुरू करण्यात आले असून भारतातील संशोधनात अधिक प्रमाणात गुंतवणूक करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
नीती आयोगाचे सदस्य डॉ. विनोद पॉल, बोस्टन सायंटिफिकचे कार्यकारी उपाध्यक्ष आर्ट बुचर, कराल्फ कार्डिनल, संजीव पांड्या, मनोज माधवन यांच्या उपस्थितीत नवीन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. बोस्टन सायंटिफिक ही अमेरिकेतील मेडिकल डिव्हाइस कंपनी असून भारतात २०१४ मध्ये त्यांनी गुरगाव येथे कंपनीचे पहिले संशोधन केंद्र केले. आतापर्यंत या केंद्राच्या माध्यमातून संशोधन करून १०० पेक्षा अधिक पेटंट प्राप्त करण्यात आले आहेत. पुण्यातील दुसऱ्या संशोधन केंद्रात १७० पेक्षा अधिक अभियंत्यांना रोजगार निर्माण होणार आहे. ७० हजार चौरस फूट जागेवर विस्तारित या संशोधन केंद्रात अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे व सिम्युलेटर्सची व्यवस्था करण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.