आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करंट लागून मृत्यू:मोटार सुरू करण्यास गेलेल्या मुलाचा शॉक लागून मृत्यू

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पाण्याची मोटार सुरू करण्यास गेलेल्या मुलाचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी वडगाव धायरी परिसरात निवृत्ती नगर चळवळ वस्ती येथे घडली. प्रणव रोहिदास निवगुणे ( १४, रा धायरी, पुणे) असे मृत झालेल्या मुलाचे नाव आहे. आंबेगाव बुद्रुक परिसरातील काशीनाथ खुटवड मेमोरियल स्कूलमध्ये प्रणव आठवीत शिकत होता. शुक्रवारी सकाळी नळाला पाणी आल्याने पाण्याची मोटर सुरू करण्यासाठी तो गेला होता. या वेळी त्याला करंट लागून तो बेशुद्ध पडला.

यातच त्याचा मृत्यू झाला. प्रणव मोटार सुरू करून का परतला नाही हे पाहण्यासाठी कुटुंबीय गेले असता, तो निपचित पडल्याचे दिसून आले. त्यामुळे त्याला तातडीने रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...