आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बलात्कार:प्रेयसीच्या अल्पवयीन मुलीवर प्रियकराचा बलात्कार

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे शहरात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असलेल्या एका ३० वर्षीय तरुणाने प्रेयसीच्या १३ वर्षीय मुलीवर राहत्या घरात तसेच इमारतीच्या टेरेसवर नेऊन बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी काकासाहेब ऊर्फ सूरज व्यंकटेश शिंदे (३०) या आराेपीवर वानवडी पाेलिसांनी बलात्काराचा आणि पाेक्साे कायद्यानुसार गुन्हा दाखल करत त्यास अटक केल्याची माहिती बुधवारी दिली आहे.

याप्रकरणी पीडित मुलीच्या ३० वर्षीय आईने पाेलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. सदर महिलेचा आराेपी सूरज शिंदे हा मित्र आहे. त्याच्यासाेबत ती लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्यास आहे. या दरम्यान आराेपीस महिलेची १३ वर्षीय मुलगी त्याला पप्पा म्हणाची. ती त्याच्यावर विश्वास ठेवत हाेती. या गाेष्टीचा तसेच ती अल्पवयीन असल्याने तिच्या अज्ञानाचा फायदा घेत सूरजने तिला तीन महिन्यांपासून त्याच्याकडे असलेल्या कारमधून एका निर्जन ठिकाणी वारंवार नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तसेच राहत्या घरातही ताे तिच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न हाेईल, असे कृत्य करत हाेता.

बातम्या आणखी आहेत...