आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईला मारत असल्याने दारुड्या वडीलाचा खून:मुलाचे कृत्य, आधी घोटला गळा, दुचाकीवरुन मृतदेह नेत फेकला बोपदेव घाटात

पुणे13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दारू पिल्यानंतर वडिल सातत्याने आईला मारहाण करीत असल्याच्या रागातून दोरीने गळा आवळून त्यांच्या खून करीत दुचाकीवर मृतदेत वाहून नेत बोपदेव घाटात फेकून देणाऱ्या मुलासह मावसभावाला कोंढवा पोलिसांनी जेरबंद केले. पोलिसांनी व्हॉटसअ‍ॅपच्या माध्यमातून मृतदेहाचे फोटो व्हायरल केल्यानंतर खबऱ्याच्या माहितीनुसार संशयितांना अटक करण्यात आली आहे.

सोनू पवन शर्मा (वय 25 रा. नऱ्हेगाव,पुणे, मूळ- मध्यप्रदेश) आणि शैलेंद्र गोवर्धन अहिरवार ( वय 22, रा. मध्यप्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पवन देबू शर्मा ( वय 40 रा. नऱ्हेगाव ,पुणे)असे खून झालेल्याचे नाव आहे.

बोपदेव घाटात मृतदेह टाकून दिल्याची घटना 14 जूनला उघडकीस आली होती. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी तपासाला गती देउन मृत पवन शर्मा यांची ओळख पटविली. तो पत्नी आणि मुलापासून वेगळा राहत असल्याचे उघडकीस आले.

13 जूनला रात्रीच्या सुमारास पवनने दारू पिल्यानंतर पत्नीला मारहाण केली होती. त्याचा राग आल्यामुळे सोनू आणि शैलेश यांनी पवनचा गळा आवळून खून करीत मृतदेह दुचाकीवर नेउन घाटात टाकून दिला.

दोघेही रेल्वेने मध्यप्रदेशात जाणार असल्याची माहिती पोलीस नाईक तुषार आल्हाट यांना मिळाली. पथकाने पुणे रेल्वे स्टोशन परिसरात सापळा रचून त्यांना अटक केली. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, उपायुक्त नम्रता पाटील, एसीपी राजेंद्र गलांडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, पोलीस निरीक्षक संजय मोगले, पोलीस निरीक्षक जगन्नाथ जानकर, पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील, सतिश चव्हाण, निलेश देसाई, गोरखनाथ चिनके, जोतिबा पवार, तुषार आल्हाट, लक्ष्मण होळकर, विशाल ठोंबरे, सागर भोसले संतोष बनसुडे यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...