आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे:घाटात ब्रेक फेल, चालकाने ट्रक चढवला मातीच्या ढिगाऱ्यावर; 40 बचावले

पुणे8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उरुळी कांचनजवळील शिंदवणे घाटात ड्रायव्हरच्या प्रसंगावधानामुळे चाळीस वारकऱ्यांचे प्राण वाचले. सोमवारी दुपारी चार वाजता शिंदवणे घाटात दुसऱ्या वळणावर वारकऱ्यांच्या ट्रकला अपघात होऊन १२ वारकरी जखमी झाले असून चार जणांची प्रकृती चिंताजनक आहे.साखरवाडी येथून सोमवारी दुपारी दोन वाजता आळंदीकडे ४० वारकरी घेऊन निघालेल्या ट्रकचा चालक पोपट यादव (रा. सोळशी नायगाव, ता. कोरेगाव, जिल्हा सातारा) याला दुसऱ्या वळणावर ट्रकचे ब्रेक फेल झाल्याचे लक्षात आल्याने त्याने प्रसंगावधान राखून मातीच्या ढिगाऱ्यावर ट्रक घातला.

बातम्या आणखी आहेत...