आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअहोध्येचे खासदार बृजभूषण सिंह यांचा वाद महाराष्ट्र विरोधातील नसून तो केवळ एका व्यक्ती (मनसे प्रमुख राज ठाकरे) विरोधात आहे. उत्तर भारतीयांच्या विरोधात राज ठाकरे यांनी भूमिका मांडल्याने त्यांची मने दुखावली आहेत. एखाद्या व्यक्तीकडून आक्षेपार्ह मत व्यक्त झाले आणि जनतेच्या भावना दुखावल्या तर त्याची प्रतिक्रिया ही संबंधित व्यक्तीविरोधात असते. संपूर्ण राज्याविरोधात नसते, असे मत राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी गुरुवारी व्यक्त केले आहे.
जवाहर राठोड यांच्या ‘पाथरवड’ कवितेचा आधार घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सातारा येथील कार्यक्रमात देवीदेवतांचे बाप काढले, असा आरोप भाजपने केला होता. सोशल मीडियावरही याप्रकरणी माेठा गदारोळ झाला. पवारांच्या वक्तव्यावर टीका केली जात आहे. यामुळे पवार यांनी गुरुवारी पुन्हा एकदा राठोड यांच्या कवितेचे वाचन करत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. हे काव्य जवाहर राठोड यांचे असून तुमच्या पाषाणातून आम्ही सर्व देव घडवले आणि तिथे आम्हालाच तुम्ही येऊ देत नाही, अशी कष्टकरी लोकांची वेदना त्यांनी मांडली आहे, असे पवार म्हणाले. पवार म्हणाले, राजकारणी लोकांपेक्षा सामान्य माणूस शहाणा असतो. तो शांतपणे निवडणुकीत निकाल देत असतो. इंदिरा गांधी यांनी आणीबाणीचा निर्णय घेतला आणि लोकशाहीवर संकट आले, असे लोकांना वाटले. लोकांनी इंदिरा गांधी यांचाही पराभव केला. त्या वेळी मोरारजी देसाई, अटलबिहारी वाजपेयी यांना सत्ता दिली. दोन वर्षांच्या आत त्यांना राज्य चालवता येत नाही हे दिसले आणि ज्या लोकांनी इंदिरा गांधी यांच्या हातातून सत्ता काढून घेतली, त्यांनीच पुढील निवडणुकीत त्यांना पुन्हा सत्ता दिली. कारण मतदार शहाणे असतात, असेही ते म्हणाले.
शरद पवार बडे दिलवाले हैं : बृजभूषण सिंह
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत असे प्रकरण झाले असते तर त्यांनी लगेच माफी मागितली असती, असे भाजप खासदार बृजभूषण यांनी गुरुवारी म्हटले आहे.
राजद्रोहाचे कलम हटवावे
राजद्रोहाचे कलम हटवण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात सकारात्मक निर्णय घेतला ही बाब चांगली आहे. हे कलम काढण्याची गरज असून इंग्रजांच्या काळात १८९० मध्ये केलेला कायदा बदलत्या काळात त्यात दुरुस्ती करणे तरी आवश्यक आहे किंवा ते काढून टाकणे तरी गरजेचे असल्याचे पवार म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.