आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुषमा अंधारे म्‍हणाल्‍या की:सदानंद कदमांवरील कारवाईमागे भाऊ रामदास कदमच

पुणे |14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सदानंद कदम यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. त्यांच्यावरील कारवाई मागे एक लाख एक टक्के त्यांचे भाऊ रामदास कदम यांचाच हात आहे, असा सनसनाटी आरोप शिवसेनेच्या (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पुणे येथे पत्रकारांशी बोलताना केला. त्या म्हणाल्या, खेडच्या सभेनंतर रामदास कदम अस्वस्थ होते. त्यामुळेच त्यांनी वरिष्ठांना सांगून सदानंद यांच्याविरोधात कारवाई घडवून आणली. मला राजकारणाचा गंध नाही. मला राजकारण कळत नाही, असे आमदार योगेश कदम म्हणत आहेत. त्यांचे म्हणणे बरोबर आहे. मला राजकारणाचा गंध नाही. कारण योगेशच्या वडिलांनी ५० खोक्यांसाठी शिवसेनेशी गद्दारी केली. राजकारणाचा गंध नसल्याने मला तशी गद्दारी करता येत नाही.

बातम्या आणखी आहेत...