आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोस्त निघाले वैरी:दारू पिण्याच्या वादातून बेदम मारहाण करून मित्राचा निर्घृण खून; दोघांविरोधात गुन्हा दाखल

पुणे13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दारूच्या वादातून दोघांनी मित्राचा खून केल्याची घटना 14 जूनला दुपारी अडीचच्या सुमारास पुण्यातील कोंढवा खुर्दमधील पारशी मैदानात घडली होती. याप्रकरणी संबंधित आरोपींना पोलिसांनी गुरुवारी अटक केली आहे.

नितीन टिकोळे (वय 35), हरेश अरुण जगताप (वय 33 रा. कोंढवा खुर्द, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपीची नावे आहेत. नितीन घोडके (वय 35 रा. रामनगर, कोंढवा खुर्द, पुणे) असे खून झालेल्याचे नाव आहे. याबाबत मयताची पत्नी ज्योती घोडके (वय 35) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन घोडके आणि हरेश जगताप हे मित्र असून, 14 जूनला दुपारी दोनच्या सुमारास हरेश आणि नितीन हे दोघे कोंढवा परिसरात ज्योती चौकजवळ पारशी मैदानात दारू पित बसले होते. त्यावेळी त्यांच्यात दारू पिण्याच्या कारणावरून भांडणे झाली. त्याच रागातून हरेशने नितीन टिकोळे याला घटनास्थळी बोलावून घेत नितीन घोडके याला बांबू आणि दगडाने बेदम मारहाण करून त्याचा निर्घृण खून केला. त्यानंतर सदर दोन आरोपी पसार झाले होते. पोलिसांनी आरोपींचा शोध घेत त्यांना जेरबंद केले आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) जगन्नाथ जानकर पुढील तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...