आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्राईम:दारूच्या नशेत तरुणावर वार करून बुलेटची तोडफोड; पुण्यातील गणेशनगर परिसरातील घटना

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दारूच्या नशेत एका तरुणाने ओळखीच्या एका तरुणावर धारदार शास्त्राने वार करून त्यास जखमी करत बुलेट गाडीची तोडफोड केल्याचा धक्कादायक प्रकार येरवडा परिसरातील गणेशनगर येथे घडल्याची माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली आहे.

याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात हेमंत विलास सुधाळे (वय- 25 ,रा.लक्ष्मीनगर ,येरवडा ,पुणे )यांनी आरोपी आदर्श नायडू( रा. येरवडा ,पुणे) याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपी आदर्श नायडू याच्यावर भादवी 324, 427 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हेमंत सुधाळे व त्यांचा मित्र शुभम अशोक गायकवाड हे दोघे गणेशनगर येथे शुभम यास घरी सोडवण्यासाठी बुलेट मोटरसायकलवरून जात होते

. त्यावेळी हेमंत याच्या ओळखीचा आरोपी आदर्श नायडू हा त्यांना वाटेत भेटला. त्यावेळी कोणतेही कारण नसताना दारूच्या नशेमध्ये कोणत्यातरी धारदार शस्त्राने त्याने हेमंत याच्या डाव्या दंडावरती वार करून त्यास जखमी केले. तसेच त्याच्या बुलेट मोटरसायकलच्या पेट्रोल टाकी वरती कशाचा तरी घाव घालून ते चेंबून नुकसान केल्याने गुन्हा घडला आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस पुढील तपास करत आहे.

बिअर शॉपी मालकास मारहाण

लोहगाव परिसरातील वाघोली याठिकाणी ए.एच बियर शॉपी या दुकानाचे मालक अनिकेत कैलास सातव (वय - 22) याच्या डोक्यात दगड मारून त्यांना जखमी करत मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी तीन आरोपींवर लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून सदर आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. संदीप अकुली स्वैन (वय 26), प्रकाश निरंजन राऊत (वय 25) सिद्धेश्वर नकुल स्वैन( 26) अशी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

तक्रारदार अनिकेत जाधव हे त्यांच्या बियर शॉपीच्या काउंटरवर असताना आरोपींना सातव यांनी काउंटर समोरून बाजूला थांबा असे म्हटल्याचा राग आल्याने, सदर आरोपींनी अनिकेत यांच्या शर्टाला व जॅकेटला धरून काउंटरच्या बाहेर घेऊन रस्त्यावर पडलेल्या दगडाने त्यांच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले आहे. याबाबत लोणीकंद पोलीस पुढील तपास करत आहेत.