आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात 4 ठिकाणी घरफोड्या:चोरट्यांनी केली पावणे अठरा लाखांची लयलूट; पिस्तूल बाळकणार्‍याला फिल्मी स्टाईल पकडले

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे शहरात घरफोडीच्या चार घटना घडल्या असून मांजरी, मंगळवार पेठ, सोरतापवाडी तसेच चतुःश्रृंगी येथे चोरट्यांनी तब्बल पावणे अठरा लाखांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर विविध पोलिस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पोलिसांनी रविवारी दिली.

घरफोडीच्या 4 घटना

  • मांजरी येथील सोलापूर रोडवरील ग्रीन अ‍ॅलेक्स भारत या सोसायटीतील प्रिसील्ला अल्बन फर्नाडीस (34) याची सदनिका बंद असताना चोरट्यांनी कडी-कोयंडा तोडून घरातील 13 लाख 86 हजार 600 रूपयांचा ऐवज चोरून नेला. यामध्ये विविध कंपनीच्या महागड्या वस्तु होत्या. ही चोरी तीन अनोळखी चोरांनी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. हा प्रकार शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडला. त्याआधारे हडपसर पोलिस तपास करत आहे.
  • फरासखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत मंगळवार पेठेतील शुभांकुर बिल्डींग मधील सचिन नंदलाल गुप्ते यांची सदनिका फोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा 94 हजारांचा ऐवज चोरून नेला.
  • तिसर्‍या घटनेत सोरतापवाडी येथील खोरावडे वस्ती येथे देऊबाई चंद्रकांत मोडक (65) ही ज्येष्ठ महिला आपल्या मुलीकडे वडगावशेरी येथे गेली होती. याची संधीसाधून चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलुप तोडून 12 नऊवारी साड्या, सोन्याची पोत असा 36 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. पुढील तपास लोणी काळभोर पोलिस करत आहे.
  • चतुःश्रृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राजंश सोसायटीतील एका 77 वर्षीय ज्येष्ठ महिलेच्या घरातील तब्बल 2 लाख 60 हजारांचे दागिने तसेच रोकड चोरून नेल्याचा प्रकार उघड झाला आहे. हा प्रकार 6 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर दरम्यान घडला असून पुढील तपास चतुःश्रृंगी पोलिस करत आहेत.

पिस्तूल बाळगणारा जेरबंद

संशयित आरोपीसह सिंहगडरोड पेलिस.
संशयित आरोपीसह सिंहगडरोड पेलिस.

बेकायदेशिरित्या पिस्तुल बाळगणार्‍या व पोलिसांची चाहुल लागताच पळून जाणार्‍याला सिंहगडरोड पोलिसांनी एकाला पाठलाग करून पकडले. केशव अशोक राठोड (24, रा. चरवडवस्ती, वडगाव बुद्रुक,पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून यावेळी एक पिस्तुल आणि एक जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहे अशी माहिती पोलिसांनी रविवारी दिली आहे. त्याने हे पिस्तुल कशासाठी बाळगले याचा पोलिस तपास करत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगडरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत सराईत गुन्हेगारांना व गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी वरिष्ठ निरीक्षक शैलेश संखे यांनी आदेश दिले होते. त्यानुसार परिसरात पेट्रोलिंग करत असताना अमंलदार राणा रसाळ व देवा चव्हाण यांना त्यांच्या बातमीदारामार्फत एक जण संशयीत रित्या सिंहगड क्षेत्रिय कार्यालया पाठीमागील रस्त्याने फिरत असल्याचे समजले. त्यांनी लागलीच याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक सचिन निकम यांना दिली. त्यांना यावेळी जिन्स पॅन्ट परिधान केलेला, दाढी वाढलेला व्यक्ती उभा असल्याचे दिसले.

त्यावेळी पोलिसांची नजरानजर होताच तो व्यक्ती पळून जात असताना पथकाने त्याचा पाठलाग करून त्याला पकडले. त्याला ताब्यात घेऊन त्याची तपासणी केली असता त्याच्या कमरेला पिस्तुल असल्याचे आढळले. त्याच्याकडून एक काडतुसही यावेळी जप्त करण्यात आले. पोलिस उपनिरीक्षक तसेच तपास अधिकारी गणेश मोकाशी, अमंलदार आबा उत्तेकर, संजय शिंदे, अमेय रसाळ, अमित बोडरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

बातम्या आणखी आहेत...