आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंद घरावर चोरट्यांचा डल्ला:भावाच्या वाढदिवसाला गेलेल्या महिलेच्या घरात चोरी; लाखाचा ऐवज लंपास

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढता आहे. अशातच पुणे शहरात विविध भागात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून 2 लाख 30 हजारांवर ऐवज चोरुन नेला. ही घटना वडगाव शेरी, वाघोली आणि उरळी देवाची परिसरात घडली आहे. याप्रकरणी येरवडा, लोणीकंद, हडपसर पोलिस ठाण्यात काल गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत पुणे पोलिसांनी सोमवारी माहिती दिली आहे.

लाखाचा ऐवज लंपास

भावाच्या वाढदिवसाला गेलेल्या महिलेच्या घरातून चोरट्यांनी 1 लाखांचे दागिने चोरुन नेले. ही घटना 1 ते 4 जून दरम्यान वडगाव शेरीतील घरोंदा सोसायटीत घडली. याप्रकरणी जोत्स्ना गायकवाड (वय 58) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. दुसऱ्या घटनेत चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने मिळून 1 लाख 6 हजारांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना 4 जूनला रात्री साडेनउच्या सुमारास वाघोलीतील मॅपल वूडस सोसायटीत घडली. याप्रकरणी सुनील किशोर शहा (वय 42) यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

बंद घरावर चोरट्यांचा डल्ला

बंद घराचा दरवाजा उघडून संसारपयोगी 22 हजारांवर साहित्य चोरणाऱ्याला हडपसर पोलिसांनी अटक केली. ही घटना 3 जूनला उरळी देवाची परिसरातील साईनिवास सोसायटीत घडली. योगेश शेलार (वय 20 रा. येरवडा,पुणे) याला पोलिसांनी अटक केली आहे. बिनी अनिलकुमार कांबळे (वय 40) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

बातम्या आणखी आहेत...