आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक:जून, जुलैत घरफोड्या; 14 गुन्हे उघडकीस, युनीट पाचची कामगिरी

पुणे7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

घरफोड्या करणाऱ्या सराईत आरोपीला गुन्हे शाखेच्या युनीट पाचने पुण्यातून अटक केली आहे. त्याच्याकडून दुचाकी, मोटार चोरी, घरफोडीसह 14 गुन्हे उघडकीस आणून 12 लाखांचा ऐवज जप्त केला. ही कारवाई शनिवारी रात्री करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी रविवारी दिली आहे. आरोपीने हडपसर, मार्केटयार्ड, लोणी काळभोर, लष्कर, इंदापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे.

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, अक्षयसिंग बिरुसिंग जुनी (वय 19 रा. बिराजदारनगर, वैदवाडी, हडपसर,पुणे ) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. वाहनचोरी रोखण्याच्या अनुषंगाने युनीट पाचचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय कृष्णा बाबर पथकासह हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पोलीस अमलदार अकबर शेख आणि विनोद शिवले यांना सराईताची माहिती मिळाली.

यानंतर पथकाने सापळा रचून अक्षयसिंग जुनी याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने पुणे शहरासह ग्रामीण भागात वाहनचोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून 4 दुचाकी 6 अशी 10 वाहने जप्त केली. त्याशिवाय 5 घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आले. या चोऱ्या चोरांनी जून आणि जुलै महिण्यात केल्याचे चौकशीअंती निष्पन्न झाले आहे.

सराईत अक्षयसिंग पिंपरी चिंचवड आयुक्तालयातंर्गत दोन गुन्ह्यात फरार होता. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, एपीआय कृष्णा बाबर, अकबर शेख, विनोद शिवले, प्रमोद टिळेकर, पांडुरंग कांबळे, रमेश साबळे, चेतन चव्हाण, अजय गायकवाड यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...