आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोरोना योद्धा:कोरोनाव्हायरसला मात देऊन एक व्यावसायिक बनला वॉर्डबॉय, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे आभार मानत रुग्णांची करतोय सेवा

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
सुभाष दररोज हॉस्पिटलची साफसफाई करुन आपल्या दिवसाची सुरुवात करतात
  • पुण्याच्या 35 वर्षीय सुभाष बबन गायकवाड यांना वॉर्ड बॉय म्हणून 15 हजार पगार मिळणार आहेत

देशात सर्वाधिक रुग्ण असणाऱ्या पुणे शहरात एक सुखद प्रकरण पाहायला मिळाले. एका व्यावसायिकाने कोरोनामुक्त झाल्यानंतर डॉक्टरांच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी रुग्णालयात वॉर्ड बॉयची नोकरी स्वीकारली. सिक्युरिटी एजन्सीचा भागीदार म्हणून दरमहा 65 हजार रुपये कमावणारा हा व्यावसायिक गेल्या अनेक दिवसांपासून रुग्णालयाची साफसफाई करत रुग्णांची काळजी घेत आहे.

अशाप्रकारे मिळाली रुग्णालयात नोकरी

पुण्यातील रहिवासी 35 वर्षीय सुभाष गायकवाड यांना वॉर्ड बॉयच्या कामासाठी 15 हजार रुपये पगार मिळत आहे. गायकवाड यांनी सांगितले की, कोरोनातून बरे झाल्यानंतर भोसरी रुग्णालयात वॉर्डबॉयच्या नोकरीसाठीची वृत्तपत्रात जाहीरात पाहिली. यासाठी त्यांनी अर्ज केला आणि एका मुलाखतीनंतर त्यांची निवड झाली. दरम्यान देवाने मला बरे करून दुसरे जीवन दिले आहे आणि आता मला कोरोना रुग्णांची सेवा करायची असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

कधीकाळी 250 लोकांची टीम सांभाळत होते

गायकवाड मुंबईच्या एका सुरक्षा एजन्सीमध्ये भागीदार होते आणि त्यांच्याकडे 250 कर्मचाऱ्यांची टीम होती. ते दररोज पुण्याच्या या रुग्णालयात येतात आणि वॉर्डबॉयच्या रुपात आपली सर्व जबाबदारी पार पाडत आहेत. ते सांगतात की, मला कमी पगाराची चिंता नव्हती. मला मानवतेची सेवा करायची आहे.

गायकवाड यांच्या पत्नी देखील रुग्णालयात नर्स

गायकवाड यांच्या पत्नी सविता पीसीएमसी द्वार संचालित पुण्याच्या भोसरी रुग्णालयात नर्स आहेत. गायकवाड यांचे गोष्ट सर्वांचे लक्ष आकर्षित करत आहे. ते म्हणाले की, मी माझ्या आयुष्यात मोठ्या संकटातून वाचलो आहे. जर तुम्ही जिवंत नसाल तर पैशाला काहीच किंमत नसते. देवाने मला आणखी एक संधी दिली आहे. रुग्णालयातील लोकांनी मला नवीन आयुष्य दिले आहे आणि मी हे आयुष्य रुग्णांचा सेवेत घालवणार आहे.