आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबिग बास्केट या व्हेंडरशिपच्या जीएसटीच्या 19 लाखांची रक्कम भरण्यासाठी मालकाने सुपरवायझरकडे दिली. मात्र, ती त्याने न भरता परस्पर खर्च केली. यानंतर मुंबईत सोन्या चांदीचे दुकान उघडण्यासाठी याच मालकाने दिलेली 40 लाखांपैकी 32 लाखांची रक्कम हडपली गेली. दोन्ही प्रकरणात फसवणूक झाल्यानंतर रक्कम मागितल्यानंतरही टाळाटाळ आणि मारण्याची धमकी मिळाल्याने मालकाने आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरात घडली.
या प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी चौघांवर गुरवारी गुन्हा दाखल केला आहे. दत्तात्रय फडतरे (वय 45, रा. पुणे) असे आत्महत्या केलेल्या दुकान मालकाचे नाव आहे. तर नाना सोलनकर, विलास कोपरटकर, उमेश पाटील, लालु मुलानी अशी संशयित आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी मृत फडतरे यांच्या पत्नीने फिर्याद दिली आहे. हा प्रकार 2016 पासून 28 मार्च या कालावधीत घडला.
ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच फसवणूक केली
दत्तात्रय फडतरे यांचे पिंपरी, पिसोळी, हिंजवडी, उबाळे नगर येथे बिग बास्केटची व्हेंडरशिप होती. त्यांनी यासाठी सुपरवायझर म्हणून नाना सोलणकर आणि विलास कोपरटकर याची नेमणूक केली होती. त्यांनी त्यांच्या दुकानांची जीएसटीची 19 लाख 50 हजार रुपयांची रक्कम नाना सोलणकर आणि विलास कोपरटकर यांना दिली होती. मात्र, त्यांनी ती रक्कम न भरता उडवली. फरताडे यांनी ती रक्कम परत मागीतली. मात्र, त्यांनी ती न देता उडवा उडवीची उत्तेरे दिली.
दूसऱ्या प्रकरणातही विश्वासघात
संशयित आरोपी उमेश पाटील आणि लालु मुलानी यांनी फडतरे यांच्याकडून मुंबईत सोन्या चांदीचे दुकान टाकायचे आहे असे सांगत 40 लाख रूपये घेतले. मात्र, दुकान न टाकता त्यातील 32 लाख रुपये उडवत केवळ 8 लाख रुपये त्यांनी परत केले.
फडतरे यांनी वेळो वेळी संशयितांना पैशांची मागणी केली. पण त्यांनी ती दिली नाही. उलट त्यांनाच त्यांनी धमकावले. यामुळे त्यांच्या छळाला कंटाळून 28 मे रोजी त्यांनी आत्महत्या केली. अखेर फडतरे यांच्या पत्नीने या प्रकरणी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.